Posts

Showing posts from December, 2024

*बोगस UDID🧑🏼‍🦽 चा सुळसुळाट* *तर याचा फटका परिवहन सेवेला*खामगाव (शेखर तायडे)संपूर्ण देशभरात दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र वैद्यकीय कार्यालयातून प्राप्त होत आहे तर UDID कार्ड युनिक डिसेबिलिटी आईडी भारतीय पोस्ट सेवेच्या माध्यमातून दिव्यांगांच्या घरी वितरित होत आहे कार्ड UDID स्वावलंबन कार्ड म्हणूनही ओळखले जाते. हा १२ अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे, जो भारत सरकारकडून दिव्यांग व्यक्तींना म्हणजेच PWD श्रेणीतील लोकांना जारी केला जातो. या कार्डचे अनेक फायदे आहेत.या कार्डाची सत्यता तपासण्याकरिता त्यावरील क्यू आर कोड Q R कोड हा स्कॅन केला असता तत्काळ त्या दिव्यांग कार्डधारकाची माहिती उपलब्ध होते तर आपल्या आधार कार्ड वरील नंबर व जन्म तारीख वरूनही याची सत्यता तपासता येते या यु डी आय डी कार्ड सारखे साम्य असलेले बोगस कार्ड घेऊन खामगाव सह संपूर्ण जिल्ह्यात राज्यात व देशात हे बोगस काळधारक दिवसा ढवळ्या जनतेच्या परिवहन ST सेवेचा लाभ घेऊन तिजोरीवर डल्ला मारत आहेनुकतीच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ST बसने बोगस कार्डाचा आधार घेत अनेक प्रवासी 'फुकट' प्रवास करीत असल्याचे समोर आले असून, चिखली येथील गत 6 दिवसात जेष्ठ नागरिकत्वाची 132 तर बोगस दिव्यांगात्वाची 76 UDID कार्ड जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती आगार व्यवस्थापक यांनी दिली.तर अश्याच पद्धतीने केंद्र व राज्य सरकारच्या विविध सेवा संस्थेचा हे स्वावलंबन कार्डधारक UDID चा लाभ घेत आहेत अश्या बोगस UDID कार्ड धा देशद्रोह सह २०१६ दिव्यांग सुरक्षा रक्षक हमी कायद्ाअंतर्गत कार्यवाही करण्यात यावी या करिता परिवहन अधिकारी यांना अधिकार द्यावे सोबतच जिं प व इतर सरकारी यंत्रणा यांना पण त्याच पद्धतीत अधिकार द्यावे जेणेकरून दिव्यागांंना बदनाम करणारे हे बोगस अपंगकायद्याच्या दहशतीने जनतेच्या पैशाला धक्का लावण्याचे धाडस यांच्या कडून होणार नाहीत

जिल्हा पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी प्रशांत देशमुख यांची नियुक्तीखामगाव - प्रेस क्लब खामगाव चे अध्यक्ष प्रशांत देशमुख यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.दिनांक२९ डिसेंबर रोजी बुलडाणा येथील पत्रकार भवनात जिल्हा पत्रकार संघाची निवडणूक घेण्यात आली त्यामध्ये प्रशांत देशमुख यांची निवड करण्यात आली. या आधी ते जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष होते.यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते नो नियुक्त पदाधिकाऱ्यांचा जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला .

"प्रा.राजेश पाटिल ताले यांच्या कार्याचा राष्ट्रिय स्तरावर सन्मान" !!!सुपरस्टार अमिताभ बच्चन,मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना ज्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे यावर्षीचा तोच पुरस्कार *आऊटस्टँडिंग यंग पर्सन ऑफ द इंडिया अवॉर्ड :- २०२४* स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष माझोड चे सुपुत्र प्रा.राजेश पाटिल ताले यांच्या कार्यावर राष्ट्रीय सन्मानाची परत नवी मोहोर उमटली आहे.नुकत्याच हैद्राबाद येथे पार पडलेल्या *६९ व्या जेसीआय इंटरनॅशनल कॉन्व्हेंशन-२०२४* मध्ये जेसीआयतर्फे स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष, युथ आयकॉन प्रा.राजेश पाटिल ताले यांना *आऊटस्टँडिंग यंग पर्सन ऑफ द इंडिया अवॉर्ड :-२०२४* या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हैदराबाद येथे Novotel HICC Convention Center ला दि.२६ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ दरम्यान आयोजित *६९ व्या जेसीआय कॉन्व्हेंशन:-२०२४* पुरस्कार सोहळयात नुकताच तो मा.श्री.कविनकुमार कार्तिकेयन(इंटरनॅशनल प्रेसिडेंट जेसीआय),ऍड.रेखेश शर्मा(नॅशनल प्रेसिडेंट जेसीआय) या मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष प्रा.राजेश पाटिल ताले यांना सन्मानित करण्यात आले.याद्वारे राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य,समाजातील युवकांना त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन जीवनात दिशा देणारे कार्य आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत संस्थेला आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन च्या वाचनालय चळवळ तसेच प्रा.राजेश पाटिल ताले यांच्या विविध व्याख्याने, कार्यशाळा,शिबिरे च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जिवनात घडुन आलेला खास बदल, दिवसेंदिवस समाजात घडत असलेला बदल,शैक्षणिक व सामाजिक कार्यातील नावीन्यपूर्ण प्रयोग,संकल्पना व त्यातून घडलेल्या प्रत्यक्ष सकारात्मक बदलांची दखल घेत हा सन्मान बहाल केला गेला आहे. स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन या संस्थेच्या कार्याला पुरस्कार रूपाने मिळालेली ही पावती हा ग्रुपच्या कार्याचा सन्मान होय.स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे संचालक मंडळ,पदाधिकारी, मार्गदर्शकमंडळ तसेच सर्व सदस्य यांची शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात झोकून देऊन काम करण्याची वृत्ती,सातत्याने राबविलेले नवनवीन प्रयोग, नवनवीन जीवन कौशल्ये शिकण्याची जिज्ञासा असलेले विद्यार्थीच या सन्मानाचे खरे वाटेकरी आहेत,अशी प्रांजळ कबुली जेसीआय महाराष्ट्र चे शैलेष बोरले(मुंबई),अंकुश सोमाणी(नाशिक) तसेच प्रतीक सारडा(चंद्रपूर) यांनी यावेळी बोलताना दिली.

*विधानसभा निवडणुकीतील विजय कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला समर्पित**आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांप्रती व्यक्त केली कृतज्ञता**निवडणुकीतील विजयानिमित्त घुग्घुस येथे भव्य नागरी सत्कार**घुग्घुस, दि.२९ - यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मी २६ हजार मतांनी विजयी झालो. विधानसभा निवडणूक जिंकण्याची ही माझी सातवी वेळ आहे. संपूर्ण महाराष्ट्रात निवडून आलेल्या २८८ आमदारांपैकी चार आमदार असे आहेत जे आठवेळा निवडून आले आहेत. आणि तीन आमदार असे आहेत जे सातवेळा विजयी झाले आहेत. त्यातला मी देखील एक आहे. पण हे यश माझे नाही, माझ्या कार्यकर्त्यांचे आहे. कार्यकर्त्यांच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झाले. कार्यकर्ता पक्षाचा आत्मा असतो. ते आमच्यापेक्षा जास्त काम करतात. घरावर तुळशीपत्र ठेवून काम करतात. त्यामुळे ‘बाजीगर’ होऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हा विजय समर्पित करताना आनंद होत आहे, या शब्दांत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सत्काराला उत्तर दिले.*घुग्घुस येथे आ. श्री. सुधीर मुनगंटीवार, आमदार देवराव भोंगळे आणि आमदार किशोर जोरगेवार यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. त्यावेळी आ. श्री. मुनगंटीवार यांनी सत्काराला उत्तर दिले. आठवडी बाजार घुग्घुस येथील स्व. प्रमोद महाजन रंगमंचावर आयोजित या सोहळ्याला आमदार देवराव भोंगळे, आमदार किशोर जोरगेवार, महानगराचे अध्यक्ष राहूल पावडे, जिल्हा महामंत्री विवेक बोढे, महीला प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम आदि नागरीक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना काही ठिकाणी संघर्ष बघायला मिळाला. पण कार्यकर्त्यांच्या मनात विजयाचा आत्मविश्वास असेल तर जगातील कुठलीही शक्ती आपल्याला रोखू शकत नाही, या शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. महायुतीला या निवडणुकीत जनतेने व लाडक्या बहिणींनी भरभरून आशीर्वाद दिला. या यशात सर्वांत मोठा वाटा लाडक्या बहिणींचा आहे. आम्हाला बहिणींनी भाऊबिजेचे रिटर्न गिफ्ट दिले, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीत तर घुग्घुसच्या जनतेने प्रेम दिलेच याचा उल्लेख आ. श्री. मुनगंटीवार यांनी केला. सत्कार सोहळ्याच्या नियोजनबद्ध आयोजनासाठी विवेक बोढे व त्यांच्या टीमचेही श्री. मुनगंटीवार यांनी कौतुक केले. देवराव भोंगळे व किशोर जोरगेवार हे त्यांच्या मतदारसंघाचा चेहरा बदलण्यासाठी काम करतील, असा विश्वास आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. त्याचवेळी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदेच्या निवडणुका आपण जिंकणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. १६ मार्च १९९५ मध्ये घुग्घुसने माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करून दिली. याच गावातील जनतेने मला निवडून दिलं नसतं तर देशामध्ये आपल्या जिल्ह्याचा गौरव वाढविणारी कामे करू शकलो नसतो. पक्षाने संधी दिली, पण लोकांनीही संधी दिली, याचा आ. श्री. मुनगंटीवार यांनी उल्लेख केला. घुग्घुसच्या विकासासाठी मी कायम सोबत आहे. आमच्यावर लोकांनी प्रेम केले आहे. त्याचे ऋण विकासकामे करूनच फेडण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे आज आमचा सत्कार नसून भविष्याच्या झंझावाती विकासकामांची ऊर्जा आहे, या शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. *धुकं कायमस्वरुपी नसतात*आम्हाला सत्तेची भूक नाही, आम्हाला विकासाची भूक आहे. पदाचीही भूक नाही. मी पदाची चिंताही केली नाही, याचाही त्यांनी उल्लेख केला. आज मुंबईहून नागपूरला विमानाने निघालो, पण विमान नागपुरात उतरलेच नाही. कारण नागपूरच्या आकाशात धुकं होते. शेवटी विमान हैदराबादला उतरले. एक तासाने वातावरण चांगले झाले आणि आम्ही नागपूरच्या विमानतळावर उतरू शकलो. आयुष्याचे असेच असते. काही क्षण धुकं येतात, पण ते कायमस्वरुपी नसतात. पुन्हा आपले विमान उतरणार, हे निश्चित असते. *भाग्यवान चंद्रपूर जिल्हा*अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिरात जगातील कोणत्याही भक्ताला माझ्या जिल्ह्यातील सागवनाने तयार झालेल्या दरवाज्यातूनच जावे लागते. देशातील कोणत्याही खासदाराला आम्ही तयार केलेल्या दरवाज्यातूनच संसदेत प्रवेश करावा लागतो. पीएमओमधील पंतप्रधानांची खूर्ची देखील आम्हीच तयार केली आहे. असा भाग्यवान आमचा जिल्हा आहे,असे आ.सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

*नामदार आकाशदादा फुंडकर यांनी खामगाव जिल्हा करण्यासाठीची वचन पुर्ती करावी,शिवसेना उबाठा ची मागणी* --- *-ऊर्मिला ठाकरे* *खामगाव-*(संतोष आटोळे) *दि.28-12-2024 रोजी**मा.नामदार ऍड. श्री. आकाशदादा फुंडकर (कॅबिनेट मंत्री, कामगार मंत्री.महाराष्ट्र राज्य) यांची* *विश्राम गृह खामगांव, (जिल्हा बुलढाणा)येथे शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्या वनश्री ऊर्मिलाताई* *श्रीकृष्णराव ठाकरे व ऍड.श्रीदेवी साबळे लहाने ताई, भानुदास दादा कराळे,व भाऊसाहेब चेंडाळणे आदिंनी... शिष्टमंडळासह भेट घेतली...* *गेल्या दहा वर्षांपूर्वी मा.प्रधान मंत्री मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांनी दहा वर्षांपूर्वी खामगांव येथील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत खामगाव जिल्हा करू असे जनतेला आश्वासित करून वचन दिले होते, त्याबाबत वचन पुर्ती करावी अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने करण्यात आली व याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आणि कॅबिनेट कामगार मंत्री पद मिळाल्याबद्दल ना.ॲड श्री.आकाशदादा फुंडकर यांचे अभिनंदन करण्यात आले.* *खामगाव जिल्हा करण्यासाठी बर्याच तरतुदी करावयाच्या आहेत... बर्याच अडचणी व त्रृटी आहेत... त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू असे कामगार मंत्री नामदार अँड.आकाशदादा फुंडकर यांनी सांगितले.* *ऊर्मिलाताई ठाकरे यांनी खामगाव जिल्हा व्हावा या साठी बरेच वेळा आंदोलने व साखळी उपोषण केलेले आहे.*

31 डिसेंबर पर्यंत आधार अपडेट करा अन्यथा होणार निराधार वेतन बंद खामगाव (शेखर तायडे)संपूर्ण राज्यभरात डीबीटी च्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेतून विधवा परितक्त्या दिव्यांग वाईतरांना मिळत असलेले लाभ हे आपल्या आधारची बँकेत लिंकिंग केलेले आधार ची प्रत 31 डिसेंबर 2024 पूर्वी आपल्या तहसील अथवा सक्षम अधिकाऱ्याकडे जमा करावी अन्यथा एक जानेवारीपासून आपले निराधार वेतन बंद होणार तरी या योजनेचा लाभ घेणारे सर्व निराधार यांनी तत्काळ आपले केवायसी करत ही कागदपत्र जमा करण्याची आवाहन शासनाच्या वतीने वेळोवेळी सूचना देऊन करण्यात येत आहे

तुकडे बंदी कायद्यात बदल सामाईक असलेल्या तुकड्यांच्या खरेदी विक्री होणार सुलभ. खामगाव ( शेखर तायडे ) नवनियुक्त राज्यातील महायूती सरकारीचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यात तुकडेबंदी कायद्याचा भंग करुन 31 डिसेंबर 2023 पर्यंत झालेले जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार प्रचलित बाजारमूल्याच्या (रेडीरेकनर) 5 % शुल्क आकारून नियमित करण्याचा राज्य सरकारनं घेतला आहे. 15 ऑक्टोबर 2024 रोजी याबाबत महाराष्ट्र शासनानं एक अध्यादेश जारी केला आहे.19 Oct 2024 नागरिकांनी खरेदी केलेल्‍या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे झालेले खरेदी विक्री चें तुकडे नियमित करण्‍यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या (दस्त) रेडिरेकनरच्या पाच टक्के रक्कम शुल्क म्हणून शासनाला भरावी लागणार आहे. त्यानंतर त्या गुंठ्याच्या खरेदी- विक्रीस परवानगी मिळेल; पण विहीर, घर बांधकाम व रस्त्यासाठीच त्या गुंठ्यांचे व्यवहार होतील.

*अटल बिहारी वाजपेई राष्ट्रीय गौरव पुरस्कारानी सुरजभैय्या यादव सम्मानीत**दिनांक 28/12/2024*खामगांव :- सामाजिक कार्यात नेहमी पुढे असलेल्या आपल्या खामगांव मधील एकनिष्ठा गौ -सेवा रक्तसेवा फाउंडेशन संस्थापक सुरजभैय्या यादव, व तसेच जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र मच्छरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अटल बिहारी वाजपेई यांच्या जयंती निमित्त एकता फाउंडेशन सामाजिक संगठन नागपुर तर्फे यांना अटल बिहारी वाजपेई राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2024 सर्टिफिॅकेट देऊन त्यांना सम्मानीत करण्यात आले. गेल्या मागील 2013 पासून एकनिष्ठा गौ -सेवा रक्तसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू गरीब आणि विशेष दिव्यांग रुग्णांना वेळोवेळी सहकार्य करून जिवन वाचविण्याची चळवळ सुरू ठेवलेली आहे. आणि अविरत सुरू राहणार आहे हा सम्मान माझा एकट्याचा नसून संघटनेशी एकनिष्ठ प्रत्येक पदाधिकारी सदस्य यांचा आहे अशी गवाही सुद्धा सुरजभैय्या यादव यांनी डॉक्टर जय संजय रामटेके संस्थापक अध्यक्ष एकता फाउंडेशन सामाजिक संगठन यांच्याशी बोलतांना दिली. एकनिष्ठा फाउंडेशन अशी माहिती चेतन कदम यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

श्री संताजी महाराज पुणयतिथीनिमित्त शोभा यात्रा. खामगाव आज श्री संताजी महाराज पु्यतिथीनिमित्त खामगाव येथे संताजी महाराज पुतळा सुटाळपुरा येथून शोभा यात्रेला टाळ मृदंग व लेझिम च्या माध्यमातून वाजत गाजत सुरवात करीत फरशी जगदंबा चौक पोलीस स्टेशन मार्ग टावर होत भिसे प्लॉट येथील संताजी महाराज सभागृह येथे समारोप तर या शोभायात्रेला सर्व तेली समाज बांधवांसह सर्व संताजी महाराज भक्त उपस्थित आहे

*अनेक दिग्गजांनी कामगार मंत्री म्हणून कार्य केले त्या खात्याचा पदभार आज आकाश फुंडकर यांनी स्वीकारला*खामगाव ( मधुकर पाटील)महत्वपूर्ण खात्यांपैकी एक असलेल्या कामगार खात्याची जबाबदारी खामगाव मतदार संघाचे युवा आमदार अॅड. आकाशदादा फुंडकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. इतक्या मोठ्या व महत्वपूर्ण असलेल्या मंत्रीपदाच्या जबाबदारीने मंत्रीमंडळात उत्कृष्ठ कामाची छाप सोडण्याचा निर्धार ना. फुंडकर यांनी केला आहे. आज त्यांनी मुंबई मंत्रालय येथे कामगार मंत्री म्हणून पदभार घेतला आणि अधिकारी वर्गाची आढावा बैठक सुध्दा घेतली. सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले युवा आमदार अॅड. आकाशदादा फुंडकर यांच्या गळ्यात पक्षाने कॅबीनेट मंत्रीपदाची माळ घातली. पहिल्यांदाच मंत्री झालेले ना. आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार खात्यासारखे अतिशय महत्वाच्या मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कामगार मंत्री ही खूप मोठी जबाबदारी आणि उत्तम कार्य करण्याची संधी आहे. कामगार मंत्रीपदाच्या कार्यक्षेत्रात अत्यंत महत्वाची कामे येतात. महाराष्ट्रातील कामगार मंत्री राज्यातील कामगार वर्गाशी संबंधीत धोरण तयार करणे, त्याची अंमलबजावणी करणे आणि कामगारांच्या हक्कांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार असतात. राज्यभरात मोठ्या संख्येने असणा-या कामगारांशी संबंधीत असणारे कामगार मंत्रालय आणि त्याचे मंत्री यांना खूप महत्व असून या पदाला न्याय मिळवून देण्यासाठी युवा नेतृत्व ना. आकाशदादा फुंडकर है पूर्णतः सक्रिय राहणार आहेत. तर यवेळीा सहायक केतन पेसोड हे सुध्दा उपस्थीत होतेे