Skip to main content
*बोगस UDID🧑🏼🦽 चा सुळसुळाट* *तर याचा फटका परिवहन सेवेला*खामगाव (शेखर तायडे)संपूर्ण देशभरात दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र वैद्यकीय कार्यालयातून प्राप्त होत आहे तर UDID कार्ड युनिक डिसेबिलिटी आईडी भारतीय पोस्ट सेवेच्या माध्यमातून दिव्यांगांच्या घरी वितरित होत आहे कार्ड UDID स्वावलंबन कार्ड म्हणूनही ओळखले जाते. हा १२ अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे, जो भारत सरकारकडून दिव्यांग व्यक्तींना म्हणजेच PWD श्रेणीतील लोकांना जारी केला जातो. या कार्डचे अनेक फायदे आहेत.या कार्डाची सत्यता तपासण्याकरिता त्यावरील क्यू आर कोड Q R कोड हा स्कॅन केला असता तत्काळ त्या दिव्यांग कार्डधारकाची माहिती उपलब्ध होते तर आपल्या आधार कार्ड वरील नंबर व जन्म तारीख वरूनही याची सत्यता तपासता येते या यु डी आय डी कार्ड सारखे साम्य असलेले बोगस कार्ड घेऊन खामगाव सह संपूर्ण जिल्ह्यात राज्यात व देशात हे बोगस काळधारक दिवसा ढवळ्या जनतेच्या परिवहन ST सेवेचा लाभ घेऊन तिजोरीवर डल्ला मारत आहेनुकतीच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ST बसने बोगस कार्डाचा आधार घेत अनेक प्रवासी 'फुकट' प्रवास करीत असल्याचे समोर आले असून, चिखली येथील गत 6 दिवसात जेष्ठ नागरिकत्वाची 132 तर बोगस दिव्यांगात्वाची 76 UDID कार्ड जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती आगार व्यवस्थापक यांनी दिली.तर अश्याच पद्धतीने केंद्र व राज्य सरकारच्या विविध सेवा संस्थेचा हे स्वावलंबन कार्डधारक UDID चा लाभ घेत आहेत अश्या बोगस UDID कार्ड धा देशद्रोह सह २०१६ दिव्यांग सुरक्षा रक्षक हमी कायद्ाअंतर्गत कार्यवाही करण्यात यावी या करिता परिवहन अधिकारी यांना अधिकार द्यावे सोबतच जिं प व इतर सरकारी यंत्रणा यांना पण त्याच पद्धतीत अधिकार द्यावे जेणेकरून दिव्यागांंना बदनाम करणारे हे बोगस अपंगकायद्याच्या दहशतीने जनतेच्या पैशाला धक्का लावण्याचे धाडस यांच्या कडून होणार नाहीत
Comments
Post a Comment