Skip to main content
"प्रा.राजेश पाटिल ताले यांच्या कार्याचा राष्ट्रिय स्तरावर सन्मान" !!!सुपरस्टार अमिताभ बच्चन,मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना ज्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे यावर्षीचा तोच पुरस्कार *आऊटस्टँडिंग यंग पर्सन ऑफ द इंडिया अवॉर्ड :- २०२४* स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष माझोड चे सुपुत्र प्रा.राजेश पाटिल ताले यांच्या कार्यावर राष्ट्रीय सन्मानाची परत नवी मोहोर उमटली आहे.नुकत्याच हैद्राबाद येथे पार पडलेल्या *६९ व्या जेसीआय इंटरनॅशनल कॉन्व्हेंशन-२०२४* मध्ये जेसीआयतर्फे स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष, युथ आयकॉन प्रा.राजेश पाटिल ताले यांना *आऊटस्टँडिंग यंग पर्सन ऑफ द इंडिया अवॉर्ड :-२०२४* या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हैदराबाद येथे Novotel HICC Convention Center ला दि.२६ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ दरम्यान आयोजित *६९ व्या जेसीआय कॉन्व्हेंशन:-२०२४* पुरस्कार सोहळयात नुकताच तो मा.श्री.कविनकुमार कार्तिकेयन(इंटरनॅशनल प्रेसिडेंट जेसीआय),ऍड.रेखेश शर्मा(नॅशनल प्रेसिडेंट जेसीआय) या मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष प्रा.राजेश पाटिल ताले यांना सन्मानित करण्यात आले.याद्वारे राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य,समाजातील युवकांना त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन जीवनात दिशा देणारे कार्य आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत संस्थेला आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन च्या वाचनालय चळवळ तसेच प्रा.राजेश पाटिल ताले यांच्या विविध व्याख्याने, कार्यशाळा,शिबिरे च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जिवनात घडुन आलेला खास बदल, दिवसेंदिवस समाजात घडत असलेला बदल,शैक्षणिक व सामाजिक कार्यातील नावीन्यपूर्ण प्रयोग,संकल्पना व त्यातून घडलेल्या प्रत्यक्ष सकारात्मक बदलांची दखल घेत हा सन्मान बहाल केला गेला आहे. स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन या संस्थेच्या कार्याला पुरस्कार रूपाने मिळालेली ही पावती हा ग्रुपच्या कार्याचा सन्मान होय.स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे संचालक मंडळ,पदाधिकारी, मार्गदर्शकमंडळ तसेच सर्व सदस्य यांची शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात झोकून देऊन काम करण्याची वृत्ती,सातत्याने राबविलेले नवनवीन प्रयोग, नवनवीन जीवन कौशल्ये शिकण्याची जिज्ञासा असलेले विद्यार्थीच या सन्मानाचे खरे वाटेकरी आहेत,अशी प्रांजळ कबुली जेसीआय महाराष्ट्र चे शैलेष बोरले(मुंबई),अंकुश सोमाणी(नाशिक) तसेच प्रतीक सारडा(चंद्रपूर) यांनी यावेळी बोलताना दिली.
Comments
Post a Comment