Skip to main content
तुकडे बंदी कायद्यात बदल सामाईक असलेल्या तुकड्यांच्या खरेदी विक्री होणार सुलभ. खामगाव ( शेखर तायडे ) नवनियुक्त राज्यातील महायूती सरकारीचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यात तुकडेबंदी कायद्याचा भंग करुन 31 डिसेंबर 2023 पर्यंत झालेले जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार प्रचलित बाजारमूल्याच्या (रेडीरेकनर) 5 % शुल्क आकारून नियमित करण्याचा राज्य सरकारनं घेतला आहे. 15 ऑक्टोबर 2024 रोजी याबाबत महाराष्ट्र शासनानं एक अध्यादेश जारी केला आहे.19 Oct 2024 नागरिकांनी खरेदी केलेल्या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे झालेले खरेदी विक्री चें तुकडे नियमित करण्यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या (दस्त) रेडिरेकनरच्या पाच टक्के रक्कम शुल्क म्हणून शासनाला भरावी लागणार आहे. त्यानंतर त्या गुंठ्याच्या खरेदी- विक्रीस परवानगी मिळेल; पण विहीर, घर बांधकाम व रस्त्यासाठीच त्या गुंठ्यांचे व्यवहार होतील.
Comments
Post a Comment