Skip to main content
*अनेक दिग्गजांनी कामगार मंत्री म्हणून कार्य केले त्या खात्याचा पदभार आज आकाश फुंडकर यांनी स्वीकारला*खामगाव ( मधुकर पाटील)महत्वपूर्ण खात्यांपैकी एक असलेल्या कामगार खात्याची जबाबदारी खामगाव मतदार संघाचे युवा आमदार अॅड. आकाशदादा फुंडकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. इतक्या मोठ्या व महत्वपूर्ण असलेल्या मंत्रीपदाच्या जबाबदारीने मंत्रीमंडळात उत्कृष्ठ कामाची छाप सोडण्याचा निर्धार ना. फुंडकर यांनी केला आहे. आज त्यांनी मुंबई मंत्रालय येथे कामगार मंत्री म्हणून पदभार घेतला आणि अधिकारी वर्गाची आढावा बैठक सुध्दा घेतली. सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले युवा आमदार अॅड. आकाशदादा फुंडकर यांच्या गळ्यात पक्षाने कॅबीनेट मंत्रीपदाची माळ घातली. पहिल्यांदाच मंत्री झालेले ना. आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार खात्यासारखे अतिशय महत्वाच्या मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कामगार मंत्री ही खूप मोठी जबाबदारी आणि उत्तम कार्य करण्याची संधी आहे. कामगार मंत्रीपदाच्या कार्यक्षेत्रात अत्यंत महत्वाची कामे येतात. महाराष्ट्रातील कामगार मंत्री राज्यातील कामगार वर्गाशी संबंधीत धोरण तयार करणे, त्याची अंमलबजावणी करणे आणि कामगारांच्या हक्कांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार असतात. राज्यभरात मोठ्या संख्येने असणा-या कामगारांशी संबंधीत असणारे कामगार मंत्रालय आणि त्याचे मंत्री यांना खूप महत्व असून या पदाला न्याय मिळवून देण्यासाठी युवा नेतृत्व ना. आकाशदादा फुंडकर है पूर्णतः सक्रिय राहणार आहेत. तर यवेळीा सहायक केतन पेसोड हे सुध्दा उपस्थीत होतेे
Comments
Post a Comment