Skip to main content
*अटल बिहारी वाजपेई राष्ट्रीय गौरव पुरस्कारानी सुरजभैय्या यादव सम्मानीत**दिनांक 28/12/2024*खामगांव :- सामाजिक कार्यात नेहमी पुढे असलेल्या आपल्या खामगांव मधील एकनिष्ठा गौ -सेवा रक्तसेवा फाउंडेशन संस्थापक सुरजभैय्या यादव, व तसेच जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र मच्छरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अटल बिहारी वाजपेई यांच्या जयंती निमित्त एकता फाउंडेशन सामाजिक संगठन नागपुर तर्फे यांना अटल बिहारी वाजपेई राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2024 सर्टिफिॅकेट देऊन त्यांना सम्मानीत करण्यात आले. गेल्या मागील 2013 पासून एकनिष्ठा गौ -सेवा रक्तसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू गरीब आणि विशेष दिव्यांग रुग्णांना वेळोवेळी सहकार्य करून जिवन वाचविण्याची चळवळ सुरू ठेवलेली आहे. आणि अविरत सुरू राहणार आहे हा सम्मान माझा एकट्याचा नसून संघटनेशी एकनिष्ठ प्रत्येक पदाधिकारी सदस्य यांचा आहे अशी गवाही सुद्धा सुरजभैय्या यादव यांनी डॉक्टर जय संजय रामटेके संस्थापक अध्यक्ष एकता फाउंडेशन सामाजिक संगठन यांच्याशी बोलतांना दिली. एकनिष्ठा फाउंडेशन अशी माहिती चेतन कदम यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
Comments
Post a Comment