Skip to main content
*नामदार आकाशदादा फुंडकर यांनी खामगाव जिल्हा करण्यासाठीची वचन पुर्ती करावी,शिवसेना उबाठा ची मागणी* --- *-ऊर्मिला ठाकरे* *खामगाव-*(संतोष आटोळे) *दि.28-12-2024 रोजी**मा.नामदार ऍड. श्री. आकाशदादा फुंडकर (कॅबिनेट मंत्री, कामगार मंत्री.महाराष्ट्र राज्य) यांची* *विश्राम गृह खामगांव, (जिल्हा बुलढाणा)येथे शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्या वनश्री ऊर्मिलाताई* *श्रीकृष्णराव ठाकरे व ऍड.श्रीदेवी साबळे लहाने ताई, भानुदास दादा कराळे,व भाऊसाहेब चेंडाळणे आदिंनी... शिष्टमंडळासह भेट घेतली...* *गेल्या दहा वर्षांपूर्वी मा.प्रधान मंत्री मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांनी दहा वर्षांपूर्वी खामगांव येथील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत खामगाव जिल्हा करू असे जनतेला आश्वासित करून वचन दिले होते, त्याबाबत वचन पुर्ती करावी अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने करण्यात आली व याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आणि कॅबिनेट कामगार मंत्री पद मिळाल्याबद्दल ना.ॲड श्री.आकाशदादा फुंडकर यांचे अभिनंदन करण्यात आले.* *खामगाव जिल्हा करण्यासाठी बर्याच तरतुदी करावयाच्या आहेत... बर्याच अडचणी व त्रृटी आहेत... त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू असे कामगार मंत्री नामदार अँड.आकाशदादा फुंडकर यांनी सांगितले.* *ऊर्मिलाताई ठाकरे यांनी खामगाव जिल्हा व्हावा या साठी बरेच वेळा आंदोलने व साखळी उपोषण केलेले आहे.*
Comments
Post a Comment