*नायलॉन मांजा जीवावर बितत आहे, पोलीस विभागाने कारवाई करावी**आपल्या शहरात मोठा साठा!**शाळा महाविद्यालयासह घंटागाडीतून जनजागृती करावी!*
*नायलॉन मांजा जीवावर बितत आहे, पोलीस विभागाने कारवाई करावी*
*आपल्या शहरात मोठा साठा!*
*शाळा महाविद्यालयासह घंटागाडीतून जनजागृती करावी!*
खामगाव
(संतोष आटोळे)
नायलॉन मांजाच्या धोकादायक वापरामुळे (विशेषतः मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर) महाराष्ट्रभर कठोर कारवाई सुरू आहे, ज्यात विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होत आहेत आणि नागरिकांमध्ये घंटागाड्यांमधून काही ठिकाणी जनजागृती केली जात आहे
कारण यामुळे दुचाकीस्वार, पादचारी आणि पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे
कठोर कारवाई:
पोलीस नायलॉन मांजाच्या विक्रेत्यांवर आणि वापरकर्त्यांवर कोणतीही दयामाया न दाखवता कठोर कारवाई करत आहेत, काही ठिकाणी विक्रेत्यांना अटकही झाली आहे.
अपघाताच्या घटना:
नायलॉन मांजामुळे गंभीर अपघात होत आहेत;मागील काळात छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ३ वर्षांच्या मुलाचा गळा कापल्याची घटना घडली, ज्यामुळे मोठा संताप व्यक्त होत आहे.
तर होत बोट कपल्याची अनेक उदाहरणे आहेत
कायदेशीर बंदी: महाराष्ट्रात नायलॉन मांजाची खरेदी-विक्री आणि वापर यावर बंदी असूनही तो कसा उपलब्ध होतो, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सणासुदीचा काळ: मकर संक्रांती जवळ येत असल्याने कारवाई आणि जनजागृती या दोन्ही गोष्टींना वेग आला आहे.
*शाळा महाविद्यालयात जनजागृती*
शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थी शिक्षणासाठी एकत्रित प्रार्थनेच्या वेळेस गोळा होत असताना त्यांना शाळा महाविद्यालय मधील शिक्षकांनी याविषयी नायलॉन मांजा मुळे नुकसान ची माहिती देऊन जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे अशी अपेक्षा मुलांच्या पालकांनी दिली
जनजागृती मोहीम: पोलीस आणि नगरपालिका संयुक्तपणे घंटागाड्यांमधून नायलॉन मांजा वापरल्यास होणाऱ्या कायदेशीर परिणामांबद्दल नागरिकांना काही ठिकाणी माहिती देत आहेत.
Comments
Post a Comment