*💥अपक्ष उमेदवार माळवंदे यांचा अर्ज मागे राष्ट्रवादी विरुध्द काँग्रेसमध्ये रंगणार लढत**💥तर अजूनही उमेदवारी माघारीचे प्रयत्न सुरू*
*💥अपक्ष उमेदवार माळवंदे यांचा अर्ज मागे राष्ट्रवादी विरुध्द काँग्रेसमध्ये रंगणार लढत*
*💥तर अजूनही उमेदवारी माघारीचे प्रयत्न सुरू*
खामगाव.
(संतोष आटोळे)
निवडणूक आयोगाने निवडणुकीचे कार्यक्रमात केलेल्या बदलानंतर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक ७ अ मधील अपक्ष उमेदवार सौ. शितल प्रितम माळवंदे यांनी आपला अर्ज आज मागे घेतल्याने प्रभाग ७ अ मध्ये आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या शारदा विनोद माळवंदे व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित) च्या गायत्री निलेश तासतोडे यांच्यामध्ये सरळ सामना रंगणार आहे. तर प्रभाग १६ व मध्ये काँग्रेस, शिवसेना व भारतीय जनता पार्टी यांच्यात तर प्रभाग ९ व मध्ये काँग्रेस व भाजपा यांच्यात तर प्रभाग ५ अ मध्ये काँग्रेस, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सामना रंगणार
आहे.
तर उर्वरित उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती अजूनही सुरू असल्याचे दिसून आले आहे
प्रभाग ९ व व प्रभाग १६ व मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाद झालेल्या उमेदवारांना दमछाक होणार आहे. अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारे दिलासा मिळाला नसून सदरचे उमेदवार हे सुप्रीम कोर्टात गेले असल्याची माहिती आहे. तर आता २० तारखेला मतदान व २१ तारखेला मतमोजणी होऊन नगरपालिकेच्या रेंगाळलेल्या निवडणुकींचे कार्यक्रम पुर्ण होणार आहेत. पुन्हा एकदा मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रावर आणून टक्केवारी कायम राखण्यासाठी प्रशासन व कार्यकर्त्यांची मात्र चांगली तयारी राहणार आहे
Comments
Post a Comment