आयुष्यमान कार्ड udid कार्ड आधार कार्ड जमा केल्यानंतरच दिव्यांग निधी
आयुष्यमान कार्ड udid कार्ड आधार कार्ड जमा केल्यानंतरच दिव्यांग निधी
खामगाव
शेखर तायडे
संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक संस्था व प्रधिकरण यामध्ये महापालिका नगरपालिका नगरपंचायत ग्राम पंचायत माध्यमातून दिव्यांग बांधवांना उपजीविकेच्या गरजेसाठी पाच टक्के स्वनिधी वाटपाचं शासनाचे धोरण आहे
या नुसार खामगाव नगरपरिषद ने एक प्रसिद्धी पत्रकातून त्यांनी
दिव्यांग व्यक्तींनी युडीआयडी कार्ड सोबत आयुषमान कार्ड सादर करन्याचे
कळविले आहे
खामगांव शहरातील सर्व दिव्यांगांना खामगांव नगर परिषदेमधील दिव्यांग रजिष्टर मध्ये नोंदणी झालेल्या दिव्यांगांना विविध योजने अंतर्गत दरवर्षी आर्थिक अर्थसहाय देण्यात येत असते.
यावेळी
सन 2025 2026 चे दिव्यांग अनुदान वितरीत करावयाचे असल्याने नगर परिषद मध्ये नोंदणी केलेल्या व सन 2025 - 2026 या आर्थिक वर्षाकरीता आपले हयात प्रमाणपत्र सादर केलेल्या सर्व दिव्यांगांनी आपले नावे असलेले आयुष कार्ड व युडीआयडी कार्ड (दिव्यांग ओळखपत्र) दोन्हीची स्वयंसाक्षाकण केलेली छायांकित प्रत दि. 15/10/2025 पुर्वी न.प. कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात सादर करावी व अधिक माहीतीसाठी नागरी सुविधा केंद्र, न. प. कार्यालय येथे संपर्क साधावा
असे
मुख्याधिकारी नगरपरिषद खामगाव
यांनी कळविले आहे
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment