सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस शेगावचे विद्यार्थी NPTEL 2025 परीक्षेत यशस्वी
सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस शेगावचे विद्यार्थी NPTEL 2025 परीक्षेत यशस्वी
शेगाव, प्रतिनिधी : जुलै–ऑक्टोबर 2025 सत्रातील प्रतिष्ठित NPTEL परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगाव येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेषतः विद्यार्थिनी पल्लवी कैलास घनोकार हिने उत्कृष्ट कामगिरी करत Programming in Java कोर्समध्ये 75 गुणांसह ‘Elite Silver Certificate’ मिळवून महाविद्यालयाचा मान वाढवला आहे.तसेच आशिष शर्मा यांनी Fundamentals of Heat Transfer या विषयात 52 गुण मिळवत उत्तीर्णता मिळवली आहे. दोन्ही विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम व तांत्रिक प्राविण्याच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवली.
संस्थेचे अध्यक्ष श्री. सागर दादा फुंडकर आणि उपाध्यक्ष नामदार ऍड. श्री आकाश दादा फुंडकर, कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अकोला जिल्हा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “NPTEL सारख्या राष्ट्रीय उपक्रमात मिळवलेले हे यश विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे आणि महाविद्यालयाच्या शैक्षणिक बांधिलकीचे प्रतीक आहे. पल्लवीने मिळवलेले Elite प्रमाणपत्र संपूर्ण संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे.”
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनंत जी. कुलकर्णी म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील आहे. NPTEL परीक्षेतील कामगिरी आमच्या तांत्रिक शिक्षणाच्या दर्जाची पुष्टी करते.”निकालानंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पुढील सत्रात अधिक विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर लाभ घेतील, अशी प्रतिक्रिया कार्यक्रम प्रमुख प्रा.श्रद्धा कडुकार यांनी दिली.
Comments
Post a Comment