बोथाकाजी येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा l भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे ग्रामस्थांनी केले वाचन
बोथाकाजी येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा l भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे ग्रामस्थांनी केले वाचन l
खामगाव .शेखर तायडे: तालुक्यातील बोथाकाजी येथे २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील बस स्थानकावर घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात ग्रामस्थांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. सर्वप्रथम प्रतिष्ठित नागरिक प्रल्हादआप्पा उकर्डे, सरपंच अलकाताई मस्के, माजी सरपंच गणेश हिवराळे यांच्या हस्ते भारतीय घटनेच्या शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारारपण करण्यात आले.यानंतर पोलीस पाटील सोपान तुंबडे यांनी उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी माजी उपसरपंच शेख राजू, मिलिंद हिवराळे, मोहन मानमोडे, शेख लुकुमान, वासुदेव हिवराळे,विठ्ठल दळवी,गजानन गावंडे, शेख मतीन,दत्तू हिरेकर रामकृष्ण हिवराळे, राहुल हिवराळे, सुरज हिवराळे, आकाश हिवराळे,करण हिवराळे, विशाल हिवराळे,मनोज हिवराळे यांच्यासह मिलिंद भाऊ मित्र मंडळ आणि समस्त गावकरी उपस्थित होते.संचालन मिलिंद हिवराळे यांनी तर आभार वासुदेव हिवराळे यांनी मानले
Comments
Post a Comment