*सोनाली वाणी यांची सेट, टीईटी, सीटीईटी, टेट .परीक्षेत उत्तुंग भरारी*
*सोनाली वाणी यांची सेट, टीईटी, सीटीईटी, टेट .परीक्षेत उत्तुंग भरारी*
धुळे
शिरपूर
(दिव्यांग शक्ती)
धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील
सोनाली योगेंद्र वाणी (योगेंद्र मंगाजी वाणी व मंगला योगेंद्र वाणी) यांची दिव्यांग कन्या
सोनाली नावाप्रमाणे जिद्द आणि धैर्याचे प्रतीक आहे, जिने अनेक संकटांचा सामना करूनही असामान्य यश मिळवले
प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व सोनाली नावाप्रमाणे त्यांच्या आयुष्यातील आव्हानांवर मात करून इतरांसाठी प्रेरणास्रोत
सोनाली
यांनी
इतिहास विषयात 2025 मध्ये झालेल्या सेट परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण घवगवित यश संपादन केले
याच नेट सेट परीक्षेतील यशाच्या भरोश्यावर
आता बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथून
संशोधन विषय असलेला महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ महिला सबलीकरणातील योगदान या
इतिहास विषयांमध्ये पी.एच.डी. करीत आहेत
सोनाली यांना मार्गदर्शक गुरु गाईड श्रीमती वर्मा मॅडम, चौधरी सर ,परदेशी सर संशोधन केंद्रातले प्राचार्य (एस पी डी एम कॉलेज शिरपूर) त्याचप्रमाणे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील तज्ञ व्यक्ती यांचे मार्गदर्शन मिळाले व मिळत आहे
याविषयी या गुरुवर्यांचे
मनापासून आभार व्यक्त करत त्यांचे उत्तम अनमोल असे सहकार्य मिळत आहे
आपल्यातील दिव्यांग असल्यावर देखील त्यावर मात करून आपल्या हिमतीवर दोन विषयांमध्ये एम ए तसेच शिक्षण शास्त्र विषयांमध्ये एम एड तसेच बीएड आणि आता पीएचडी करीत असताना सोनाली यांच्या आई-वडिलांचे पूर्णपणे सहकार्य मिळत आहे
आज पर्यंत त्यांनी दिव्यांग असल्याची जाणीव कधीही होऊ दिली नाही
मनातही बसू दिली नाही
याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करीत त्यांचे हे ऋण या जन्मी तरी फेडता येणार नाही असे भावनिक मनोगत त्यांनी व्यक्त केले
Comments
Post a Comment