नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार सौ. अपर्णा फुंडकर यांनी प. पू. काका माऊलींच्या समाधीचे दर्शन घेऊन केला प्रचाराचा शुभारंभ
नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार सौ. अपर्णा फुंडकर यांनी प. पू. काका माऊलींच्या समाधीचे दर्शन घेऊन केला प्रचाराचा शुभारंभ
खामगाव
निरज सुराणा
खामगाव न.प. अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत भाजपचे अधिकृत उमेदवार सौ. अपर्णा सागर दादा फुंडकर यांनी काल १८ नोव्हेंबर २५ रोजी दुपारी श्री क्षेत्र बरसाना येथे प.पू. काका माऊलीच्या समाधीचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी श्रीमती सुनिताताई पांडुरंग फुंडकर, सागरदादा कुंडकर, सौ. स्नेहा आकाशदादा फुंडकर सह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम सौ. अपर्णा फुंडकर यांनी नारळ फोडून प्रचाराला सुरूवात केली. प्रभाग क्र. १ पासुन प्रचार फेरौला सुरूवात करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्र. १ चे उमेदवार सौ. रुपाली रविराज गायगोळ व प्रशांत नायसे तसेच प्रमोद अग्रवाल, विलासराव देशमुख, शेखर पुरोहित, पंकज गिरी, लक्ष्मण आयलानी, बंडु कुटे, देवेश भगत, अमोल राठोड, संदिप राजपूत, चंद्रकांत रेठेकर, संजय पेसोडे, ज्ञानदेवराव मानकर, डीगंबर गलांडे, वैभव डवरे
यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रभाग क्र. १ मधील नागरीकांना मतदान रुपी आशीर्वाद मागण्यासाठी आलेल्या तीनही उमेदवारांचे नागरिकांनी स्वागत केले. त्यांचे औक्षण करून आशिर्वाद दिले. संपूर्ण प्रभागातून नागरीकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा शहराध्यक्षा भाम्यश्री मानकर, खामगाव ग्रामीण १ च्या महिला अध्यक्षा श्रध्दा धोरण, माजी नगराध्यक्षा अनिता डवरे, शिवानी कुळकर्णी, संतोषदेवी पुरोहित, स्नेहा चौधरी, भाग्यश्री रोहणकार, लक्ष्मी मिश्रा, सौ. आरती भेलके, सौ. मंगला रायणे, श्रीमती
सविता ठाकरे, सौ. भाग्यश्री रोहणकार, राहणे काकू, सौ. प्रिया रायणे, ज्योती भुसारी, अर्चना कनारे, भाग्यश्री फाळके, सौ. प्रमिला फुंडकर, सौ. दुर्गा महाले, सौ. सरिता मिरगे, मानसी वडोदे, सौ. जयश्री वाघ,
सौ. योगिता पाटे खेडे, दिपा बेलोकार, शारदा कराळे, डॉ. जयश्री गायकवाड, जयश्री वनारे,
कल्पना सरदार, कल्पना लाहुडकार, सरिता राहणे उपस्थित होते
Comments
Post a Comment