श्री महादेव मारुती सस्थान ३१ व्या वर्धापन दिन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त राजेंद्र बघे यांच्या पुढाकारातून २० लक्ष रुपयाचे सभगृहचे लोकार्पण

श्री महादेव मारुती सस्थान ३१ व्या वर्धापन दिन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त राजेंद्र बघे यांच्या पुढाकारातून २० लक्ष रुपयाचे सभगृहचे लोकार्पण 

(शेखर तायडे)
श्री महादेव मारुती संस्थान ३१ व्या वर्धमान दिनानिमित्त तसेच केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे यांच्या पुढाकारातून भव्य दिव्य बांधण्यात आलेल्या 20 लक्ष रुपयांच्या श्री हनुमान मंदिर सभागृह लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
दिनांक २५/११/२०२५ रोजी पिंप्री गवळी येथे श्री महादेव व मारुती देवस्थानच्या वर्तमान दिनानिमित्त शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताह सात दिवस कीर्तन सेवा व संध्याकाळी,हरिपाठ, सकाळी पाच वाजता काकडा आरती,रोज संध्याकाळी ९००/१००० लोकांची जेवण पंगत,सप्ताहाची सांगता शिवपुराण कथा वाचक ह.भ.प.श्री रेवन महाराज चव्हाण यांच्या काल्याचे कीर्तनाने तसेच २००० हजार लोकांच्या महाप्रसादाने गावामधून भव्य दिव्य रथयात्रेत हजारो लोकांच्या सहभागाने टाळ मृदंगाच्या गजरात अत्यंत उत्कृष्ट गायनाचार्य मृदंगाचार्य  पिंप्राळा,पिंपरी गवळी,टेंभुर्णा,आवार कोलरी,येथील टाळकऱ्यांच्या व विशेष करून महिलांचा गावकऱ्यांच्या तसेच पुढील मान्यवरांच्या सहकार्यातून सप्ताह यशस्वी झाला त्यामध्ये ह.भ.प.जनार्दन महाराज चांदुरकर,डॉक्टर हरिदास गासे,भानुदास पाटील काळे,रामदास बघे,दिगंबर उमाळे, किसनराव बंड,प्रशराम उमाळे,ह.भ.प.दिनेश महाराज राठोड,अरुण महाराज बोदडे,शालिग्राम अहिर,बलराब श्यामसुंदर,श्रीकृष्ण चोपडे, श्रावण भोपे,विष्णू सुळोकार,दिलीप सिंह पवार, जनार्दन मोरे,बळीराम सिंह तोमर,गजानन सुडोकार, संजय सुळोकार, किसनरावजी बहादरे, प्रकाश सिंह तोमर,सागर सिंह पवार,गजानन  सपकाळ,जगन्नाथ भगत, नारायण गासे,गजानन डवंगे, शालिग्राम लाहुडकर, माणिकरावजी देशमुख, गजानन बघे,विनायक केने, प्रल्हाद गोळे,भास्कर डवंगे जगदीश पवार,शशांक पवार, गणेश भगत,अर्जुन राठोड, नितीन ठाकूर,सोपान पायघन,भगवान पायघन, रामदास वडोदे,प्रल्हाद चोपडे,ज्ञानेश्वर चोपडे संतोष वाघमारे,तेजस सिंह बयस, अमोल पुसदेकर,सुरेश डिगळे,उत्तम सोनवणे अमोल रवींद्र बयस, गजानन अवथडे,देविदास हरमकार,शिवदास राठोड,गोकुळ राठोड, अनिल सिंह पवार,रामदास पिंपळकार,गोविंदा हरमकर, वसंता पिंपळकार,सदाशिव वैद,पुरुषोत्तम हाडोळे, सदाशिव भगत,महेश भास्कर गाडे,वासुदेव हरमकार,श्रीकृष्ण सूर्यकांत, लीलाधर मोरे,प्रल्हाद भगत, राजू वडोदे,गजानन हेंबाडे, मनोहर बंड,शंकर गोळे, उमेश राऊत,अतींसह गावातील महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.