*शिवसेनेकडून (शिंदे गट) खामगाव नगरपरिषद निवडणुकीत दमदार एन्ट्री! कट्टर हिंदुत्ववादी सौ. अश्विनीताई माळवंदे नगराध्यक्षपदासाठी मैदानात*
*शिवसेनेकडून (शिंदे गट) खामगाव नगरपरिषद निवडणुकीत दमदार एन्ट्री! कट्टर हिंदुत्ववादी सौ. अश्विनीताई माळवंदे नगराध्यक्षपदासाठी मैदानात*
खामगाव
(संतोष आटोळे)
हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधत शिवसेनेतर्फे (शिंदे गट) खामगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि केंद्रीय मंत्री .ना. प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे *सौ. अश्विनीताई रवी माळवंदे नगराध्यक्षपदासाठी रिंगणात*
कट्टर हिंदुत्ववादी, गोरक्षक, अन्यायाविरुद्ध कायम लढणारे, गरीब-मोलमजुरी करणाऱ्या अतिक्रमणधारकांच्या प्रश्नांसाठी आघाडीवर असलेले रवी माळवंदे यांच्या पत्नी
सौ. अश्विनीताई रवी माळवंदे
यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
यामुळे खामगाव राजकारणातील अनेकांची गणिते ढवळून निघाल्याची चर्चा शहरात जोमात आहे. अतिक्रमणविरोधी कारवाईत त्रस्त झालेल्या अनेक कुटुंबांनी दीर्घकाळ नगरपरिषद निर्णयांविरोधात मोठी आंदोलने केली होती. त्यांना आधार देत लढाई लढणाऱ्या माळवंदे दाम्पत्याला आता मोठ्या प्रमाणात लोकसमर्थन मिळताना दिसत आहे.
🔸 *अतिक्रमण धारक, गोरक्षक व नागरिक संघटनांचा ठाम पाठींबा*
गेल्या काही महिन्यांत नगरपरिषद कारवाईतील अन्यायाविरुद्ध उभारलेल्या चळवळीमुळे सौ. माळवंदे यांचे नाव जनतेत वेगाने पोहोचले.
त्यामुळे हजारो नागरिक—महिला, पुरुष, युवक—यांनी स्वाक्षरी करून त्यांची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी प्रतापराव जाधव यांच्याकडे केली होती.
त्यांना अधिकृत उमेदवारी मिळताच शहरात समाधान आणि उत्साहाचे वातावरण आहे.
🔶 *शिवसेनेचे उमेदवार “गेमचेंजर” ठरण्याची शक्यता*
शिवसेनेकडून दिले गेलेले उमेदवार सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून पुढे आलेले, थेट लोकांशी नाळ जुळवणारे आणि समाजकार्यात आघाडीवर असलेले असल्यामुळे “यंदाची निवडणूक वेगळी ठरणार” अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
तसेच तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, शहरप्रमुख चेतन ठोंबरे, युवा सेना आणि स्थानिक गोरक्षक संघटनांच्या सक्रिय कामामुळे तरुणांचा पक्षाकडे कल वाढत आहे.
🟢 *शिवसेनेकडून नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या उमेदवारांची यादी*
1. सौ. पुष्पाताई मोहन ठोंबरे -( प्रभाग 16)
2. अॅड. रमेश भट्टड -( प्रभाग 8)
3. सौ. सरोजताई भट्टड -( प्रभाग 6)
4. अनुजा करण बिडकर -( प्रभाग 14)
5. सौ. अंकिताताई राहुल कळमकार -( प्रभाग 11)
6. सौ. ज्योतीताई निलेश देवताडू -( प्रभाग 8)
7. कमलेश हवेलीया -( प्रभाग 15)
8. सोनालीताई तराडे -( प्रभाग 15)
9. सौ. छायाताई खराळे -( प्रभाग 15)
10. विकासभाऊ जंवजाळ -( प्रभाग 3)
11. निर्मलाताई हेलोडे -( प्रभाग 3)
12. सौ. कविता ताई सारसर -( प्रभाग 3)
13. अमोलभाऊ जांबे -( प्रभाग 5)
14. शामभाऊ गायकवाड -( प्रभाग 10)
या सर्व उमेदवारांचे अर्ज शिवसेनेतर्फे विधिवत दाखल करण्यात आले.
🟤 *अर्ज दाखलवेळी शिवसेना नेते उपस्थित*
या वेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख शांताराम दाणे, उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे, तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, सेवा प्रमुख संतोष लिप्ते, शहरप्रमुख चेतन ठोंबरे, अॅड. रमेश भट्टड, युवा सेना शहरप्रमुख राहुल कळमकर, निलेश देवताडू, नंदलालजी भट्टड, संघटक तब्बू तायडे, उपशहरप्रमुख करण बिडकर, राहुल ठोंबरे, शुभम मोरे, गणेश हवेलीया, विकी खराडे, विकी तराळे, राजेश तांबटकर, सागर बेडवाल, आनंदसिंग चौहान, सोहम चौहान आदींसह अनेक गोरक्षक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment