*खामगाव येथील काही प्रभागची निवडणूक थांबली!, या तारखेला होणार निवडणूक**देऊळगाव राजा शेगाव जळगाव जामोद येथील काही प्रभागातही हीच परिस्थिती*
*खामगाव येथील काही प्रभागची निवडणूक थांबली!, या तारखेला होणार निवडणूक*
*देऊळगाव राजा शेगाव जळगाव जामोद येथील काही प्रभागातही हीच परिस्थिती*
खामगाव
(शेखर तायडे)
न्यायालयीन अपील दाखल झालेल्या नगरपरिषदा मधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणुक कार्यक्रम-२०२५ बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, जळगाव जामोद, आणि देऊळगाव राजा नगरपरिषदा मध्ये अपील दाखल करण्यात आले होते त्या अपीलां वरील निकाल दि.२२/११/२०२५ रोजी पर्यंत होणे आवश्यक होते जेणेकरुन संबंधित उमेदवारास त्याचे नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम-१९६६ मधील नियम १७ (१) (ब) नुसार तीन दिवसाचा कालावधी मिळाला असता व त्यानंतर दि.२६/११/२०२५ रोजी वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारास निवडणूक चिन्ह वाटप करणे नियमानुसार योग्य ठरले असते, परंतु नगरपरिषदेच्या संदर्भात नगरपरिषद यांचे नाव सुधारित कार्यक्रमानुसार
जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, व जळगाव जामोद या नगरपरिषदेतील अपीला चा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून दि.२२/११/२०२५ नंतर म्हणजेच दि.२५/११/२०२५ रोजी देण्यात आलेला आहे. त्यामुळे उपरोक्त नगरपरिषदांमध्ये सदस्य पदाच्या जागेच्या निवडणुका दि.०४/११/२०२५ रोजी च्या कार्यक्रमानुसार घेण्यात येणार नाही. तसेच देऊळगाव राजा नगरपरिषदे मध्ये अध्यक्ष पदाचा समावेश असल्या कारणाने संपूर्ण नगरपरिषदेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे व ती दि. २९/११/२०२५ रोजीच्या सुधारित खालील वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात येईल याची संबंधित मतदार व उमेदवार यांनी नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी प्रसिद्धस दिले आहे
तर सुधारित निवडणूक कार्यक्रम ज्यामध्ये देऊळगाव राजा नगरपरिषद निवडणूक होणाऱ्या मतदान प्रक्रिया मधून
खामगाव येथील
प्रभाग क्रमांक ५ अ, ७ अ,९ ब व १६ ब मध्ये दिनांक २०/१२/२०२५ रोजी सकाळी ०७:३० ते संध्याकाळी ०५:३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राहील
तर मतमोजणी
२१/१२/२०२५ रोजी राहणार आहे
अशीच निवडणूक प्रक्रिया देऊळगाव राजा संपूर्ण नगर पालिका,शेगाव प्रभाग क्रमांक ४ अ व ४ ब जळगाव जामोद प्रभाग क्रमांक ६ अ, ६ ब प्रभाग क्रमांक ७ ब येथे राहील
Comments
Post a Comment