अमरावती विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन महिला बॉक्सिंग स्पर्धेत यशाचे मानकरी
अमरावती विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन महिला बॉक्सिंग स्पर्धेत यशाचे मानकरी
खामगाव
(संतोष आटोळे)
स्थानिक श्रीमती सु.रा.मोहता महिला महाविद्यालयाच्या विविध वजन गटातील बॉक्सिंग टीमने नुकत्याच अकोला येथे संपन्न झालेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन महिला बॉक्सिंग स्पर्धेत महाविद्यालयाच्या कु. वैष्णवी राजू सपकाळ कु. श्रद्धा दर्शन मुंग्यालकर कु.चैताली विजय सिंग डाबेराव कु.प्रतीक्षा श्रीकृष्ण वानखेडे कु. स्वरा प्रदीप अवधूत कु.भक्ती महादेव सुकाळे बॉक्सरने विविध वजन गटात आपला सहभाग नोंदविला होता पैकी कु. प्रतीक्षा श्रीकृष्ण वानखेडे हिने 65 किलो वजन गटांमध्ये चुरशीची लढत देवून सिल्वर मेडल ची मानकरी ठरली आहे. मागील वर्षी प्रतिक्षा हिची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ बॉक्सिंग संघात निवड होऊन कलर कोटची मानकरी ठरली होती. 57 किलो वजन गटात कु. श्रद्धा दर्शन मुंग्यालकर ही ब्रांन्झ मॅडमची मानकरी ठरली आहे. कु. स्वरा प्रदीप अवधूत 70 किलो वजन गटात, कु. भक्ती महादेव सुकाळे 80 किलो वजन गटात या ब्रांन्झ मेडलच्या मानकरी ठरून महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल दि. नॅशनल एज्युकेशन संस्थेचे सर्व पदाधिकारी ,प्राचार्य सौ हेमा एस जंवजाळ , संचालक खेळ व शारीरिक शिक्षण प्रा.
डॉ .सिमा वि देशमुख, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment