*एपीएमसीच्या असुविधा मुळे उपोषण*
*एपीएमसीच्या असुविधा मुळे उपोषण*
मलकापूर
(दिव्यांग शक्ती)
मलकापूर येथील
मौजे बेलाड येथील मार्केट यार्ड मध्ये शेतकऱ्यासंबधी विविध समस्या
आहेत. त्या समस्यांचे निराकरण व्हावे याकरिता उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे
अ) महिला कास्तकारांना शौचालय नसणे.
ब) मार्केटयार्ड मध्ये पुरेश्याप्रमाणात सि.सी.टी.व्ही. नसणे,
क) कास्तकारांना जेवनाची व्यवस्था नसणे.
ड) कास्तकारांना शुध्द पिण्याचे पाणी नसणे आणी इतरही समस्या
आहेत.
वरील समस्या जेव्हापासुन मार्केटयार्ड चालु आहे तेव्हापासुन आहे. भारत हा कृषीप्रधान देश असताना देखील शेतकऱ्यांचे खुप जास्त हाल होत आहे. मार्केटयार्ड मध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, जे पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे त्या पाण्यामध्ये जिव जंतु असुन स्वच्छ पाणी पिण्यासाठी नाही. तसेच सदरहु मार्केटमध्ये कमी म्हणजेच बोटावर मोजण्याऐवढे सि.सी. टी. व्ही असल्यामुळे तेथुन शेतकप्याचे धान्य चोरीला जाते. मार्केडयार्ड मध्ये शेतकऱ्यांना दिवसदिवस भर राहावे लागते परंतु तिथे जेवनाची कोणतीही व्यवस्था नाही. शेतकऱ्यांना दिवसभर मार्केटमध्ये राहावे लागते तर त्यांना
उपाशी पोटी राहावे लागते. तसेच महिला शेतकऱ्यांना शौचालयाची व्यवस्था देखील नाही. यामुळे सर्व शेतकरी / कास्तकार यांच्यावर एका प्रकारे अन्याय होत आहेत. आपल्या देशात जनतेच्या हितासाठी सकाळी शपथविधी होवू शकतो तर एखादया मंत्र्यांच्या दौऱ्या निर्मीत्त हेलीकॉप्टर उरण्यासाठी लाखो रूपये खर्च करून हेलीकॉप्टर उत्तरवण्यासाठी जागा करण्यात येते. रोड बांधण्यात येता गडडे भुजण्यात येता त्यांच्यासाठी शाही जेवनाची तयारी करण्यात येते. तसेच रोड ब्लाक करून जनतेला त्रास दिला जातो. मुख्य सांगायचे म्हणजे देशातील राजकीय लोकांसाठी युध्द पातळीवर कार्य केल्या जाते त्याच धरतीवर जगाचा पोशिदा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी युध्द पातळीवर कार्य व्हावेत.
वरील समस्या सोडवण्यासाठी ७ दिवसाचा कालावधी खुप असुन आपण समस्यावर लक्ष देवून वरील समस्यां ७ दिवसाचे आत सोडवण्यात याव्यात. नाहीतर आम्ही ८व्या दिवशी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करू मग त्यापासुन येणाऱ्या परिणामास तुम्ही सर्वस्वी जबाबदार राहाल.
असे डॉक्टर हनुमान भगत यांनी प्रसिद्धीस दिले आहे
Comments
Post a Comment