खामगाव: शंकर नगरात मुस्लिम बांधवांचा 'फुंडकर' व 'बोबडे' परिवार वर विश्वास; शेकडोंचा सामूहिक राजकीय प्रवेश.
खामगाव: शंकर नगरात मुस्लिम बांधवांचा 'फुंडकर' व 'बोबडे' परिवार वर विश्वास; शेकडोंचा सामूहिक राजकीय प्रवेश.
खामगाव (बुलढाणा): २३ नोव्हेंबर २०२५
खामगावच्या राजकीय पटलावर आज एक महत्त्वपूर्ण घटना घडली, ज्यामुळे स्थानिक राजकारणाचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. शहरातील शंकर नगर परिसरातील आज सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन मोठ्या संख्येने , बोबडे परिवार आणि फुंडकर परिवार यांच्या नेतृत्वावर आपला सामूहिक विश्वास दाखवून माननीय नामदार आकाश भाऊ फुंडकर कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत एकत्रितपणे भाजपा मध्ये प्रवेशाची घोषणा केली.
यावेळी बोबडे यांच्या निवासस्थानी परिसरातील शेकडो मुस्लिम बांधवांनी हा राजकीय निर्णय घेतला. विशेषतः, स्थानिक विकासाचे मुद्दे आणि परिसराच्या समस्या सोडवण्यासाठी हे दोन्ही परिवार ठोस भूमिका घेत असल्याचा विश्वास या नागरिकांनी व्यक्त केला.
या सामूहिक प्रवेशाचे नेतृत्व करणाऱ्या स्थानिक प्रतिनिधींनी सांगितले की, "फुंडकर आणि बोबडे" या दोन्ही परिवारांनी आजपर्यंत जात-पात न पाहता विकासाच्या कामांना प्राधान्य दिले आहे. आमच्या परिसराच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन आणि पाठिंबा निर्णायक ठरेल, म्हणूनच आम्ही आज त्यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे." या वेळी सर्व ज्येष्ठ पासून तर युवा बांधव उपस्थित होते.
👉 राजकीय जाणकारांचे मत:
राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा सामूहिक प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. शंकर नगर भागातील मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळणे हे बोबडे व फुंडकर परिवाराच्या गटासाठी एक मोठे बळ ठरणार आहे, ज्यामुळे या भागातील मतदानाचे ध्रुवीकरण निश्चितपणे बदलेल.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी दोन्ही परिवाराच्या वतीने सर्व नवीन सदस्यांचे स्वागत करण्यात आले आणि त्यांच्या विश्वासाला तडा न जाईल, याची ग्वाही देण्यात आली.
कार्यक्रमाच्या वेळी नामदार आकाशभाऊ फुंडकर,सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक अजिंक्य बोबडे , प्रशांत बोबडे, विशाल बोबडे , वैभव डवरे, नगरसेवक पदाचे दोन्ही उमेदवार अनिता ताई डवरे व गौरव बोबडे , जसवंतसिंह शिख, संतोष टाले, मुन्नाभाऊ पुरवार , अशोक भुसारे , रमेश इंगळे व समस्त बोबडे परिवार .
मुस्लिम बांधवांपैकी ज्येष्ठ व्यक्तींमधून
हाजी शेख चांद शेख लाल साहब,हाजी शेख हबीब साहब, हाजी शेख रहीम साहब , इकबाल खान , शेख रशीद भाई , शेख हुसेन सदर , शेख युसूफ भाई , शेख अन्वर मिर्झा, शेख, रियाज ठेकेदार, शेख झहीर उपस्थित होते.
Comments
Post a Comment