युगधर्म पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची पार्ले फॅक्टरीला शैक्षणिक भेट
युगधर्म पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची पार्ले फॅक्टरीला शैक्षणिक भेट
खामगाव
संतोष आटोळे
युगधर्म पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गुरूवारी पार्ले फॅक्टरीला शैक्षणिक भेट देऊन उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या भेटीमध्ये विद्यार्थ्यांना बिस्किट व इतर खाद्यपदार्थांच्या निर्मिती प्रक्रिया, आधुनिक यंत्रसामग्रीची कार्यपद्धती तसेच स्वच्छता व गुणवत्ता नियंत्रणाची माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी फॅक्टरीतील विविध विभागांना भेट देत उत्पादन कसे तयार होते, त्यातील तांत्रिक टप्पे, पॅकिंग तसेच वितरण प्रक्रिया याबाबत उत्साहाने प्रश्न विचारले. मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील नवकल्पना आणि कौशल्यांच्या संधी याबद्दलची प्रेरणादायी माहिती दिली.
या शैक्षणिक दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांचे औद्योगिक ज्ञान समृद्ध झाले असून प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी त्यांना मिळाली. शाळेच्या व्यवस्थापनाने अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योग यांविषयीची आवड वाढते असे सांगितले.
विद्यार्थ्यांना पार्ले कंपनीतर्फे बिस्कीट तसेच चॉकलेट चे वितरण करण्यात आले.तसेच या शैक्षणिक भेटीनंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी जनुना येथील रेणुका माता मंदिरात जाऊन सहभोजनाचा आनंद घेतला.
ही शैक्षणिक भेट शाळेचे प्राचार्य श्री अनिरुद्ध अवचार सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
या शैक्षणिक सहलीसाठी प्राचार्य अनिरुद्ध अवचार सर यांच्यासह उपप्राचार्य सौ .अंकिता राठी मॅडम ,सहाय्यक शिक्षिका सौ .संगीता देशमुख मॅडम, सौ .सपना रेठेकर मॅडम , तसेच सौ .रेखा राऊत मॅडम सौ .कल्पना वानखेडे मॅडम, जिया मथानी मॅडम तसेच शाळेच्या मदतनीस वैशाली ताई , सुरेखा ताई यांचे योगदान लाभले.
.
Comments
Post a Comment