दुबई येथे महाराष्ट्रातील वारकऱ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा केला
दुबई येथे महाराष्ट्रातील वारकऱ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा केला
अकोटः
(मनोज भगत)
महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा दुबई येथील विदेशात १७ नोव्हेंबर रोजी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
हा सोहळा कार्तिकी वद्य त्रयोदशीच्या तिथीला आली असल्याने महाराष्ट्रातील वारकरी भावी भक्त हे दुबई दौऱ्यावर होते या ठिकाणी ह भ प गणेश महाराज शेटे यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर संत गजानन महाराजांच्या विजय ग्रंथ व प्रतिमा पूजन करण्यात आले याप्रसंगी भाविक भक्तांनी आरती केली त्यानंतर प्रा. माया म्हैसने यांनी पसायदान म्हटले. महाराष्ट्रातील वारकरी हे जगात कुठेही असले तरी संत ज्ञानेश्वर महाराजांनी शिकवण दिलेल्या हे विश्वचि माझे घर या ओळीप्रमाणे भावी भक्तांनी विदेशात आपल्या अध्यात्म व संस्कृतीचे जतन करीत वारकरी पोशाखात हा समाधी सोहळा साजरा केला या सोहळ्याला महाराष्ट्रातीलच नव्हे तर विदेशी पर्यटकांनी सुद्धा हजेरी लावली होती त्यांनी सुद्धा संत ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेतले त्यामुळे हा संजीवनी सोहळा लक्षवेधी ठरला होता. या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर भावीकभक्त उपस्थित होते. ह भ प गणेश महाराज शेटे हे परमहंस आंतरराष्ट्रीय यात्रा कंपनीच्या माध्यमातून चारधाम सह भाविक भक्तांना विजय दौराकडून आणतात एवढ्या दौरा दुबईतील विदेशात असल्यामुळे त्यांनी या समाधी सोहळ्याचे खास आयोजन केले होते
Comments
Post a Comment