⏰खामगाव शहर स्वच्छ,सुंदर व समस्यामुक्त बनविण्यासाठी⏰ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा💥माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा जय गुरू काका-जय गुरू नाना च्या जयघोषात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.चेतना शर्मा यांच्या प्रचाराला जल्लोषात शुभारंभ

⏰खामगाव शहर स्वच्छ,सुंदर व समस्यामुक्त बनविण्यासाठी⏰ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा💥
माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा  
 जय गुरू काका-जय गुरू नाना च्या जयघोषात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.चेतना शर्मा यांच्या प्रचाराला जल्लोषात शुभारंभ

खामगाव
(संतोष आटोळे)
 खामगाव नगर परिषदेतील सत्ताधारी शहरवासीयांना मूलभूत सुविधा देण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शहराचा पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्यामुळे शहरवासीयांचे हाल होत आहे. विकासकामांच्या नावाखाली कोटयावधी रुपयांचा भ्रष्टाचार करुन अपुर्ण अवस्थेत असलेल्या सिमेंट रस्ता बांधकामामुळे जनता त्रस्त झाली आहे. रस्त्यावरील खडडे, अस्वच्छता यासह नागरीकांना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांमुळे शहर विकासापासून दूर गेले आहे. खामगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी  अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच सक्षम पर्याय असून नागरिकांनी खामगाव नगर पालीकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे नगराध्यक्ष पदाची निवडणुक लढविणाऱ्या  सौ.चेतना शर्मा यांच्यासह नगरसेवक पदाकरीता उभ्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना आपले आशिर्वादरुपी मते देवुन विजयी करावे असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले. गुरुवार दि.20 नोव्हेंबर 2025 रोजी खामगाव नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.चेतना शर्मा यांच्या सह इतर सर्व उमेदवारांच्या प्रचाराला अमृत नगर भागातील श्री क्षेत्र बरसाना येथुन जल्लोषात शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहरअध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासणे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. चेतना संजय शर्मा, बहुभाषीक ब्राम्हण सभेचे अध्यक्ष संजय शर्मा तसेच  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नगरसेवक पदाकरीता निवडणुक लढविणारे उमेदवार सौ. प्रांजली प्रशांत धोटे,सौ.आरती गवई, सुनिल शांताराम जाधव, सौ.तृप्ती अभय गोडबोले,संदिप वर्मा, अरविंद ढगे, दिनेश गावंडे, निता नागराणी, सौ.गायत्री तासतोडे,आनंद गायगोळ,सौ.खुशबु निलेश गव्हाळ, रवि जोशी, सौ.शितल देशमुख,कृष्णा पाटील,सौ.सविता मानकर,ओमप्रकाश शर्मा,आनंद किलोलीया, आकाश खरपाडे,रविंद्र बोंद्रे,श्याम मोरे,सौ.सुनिता जाधव, कैलास सारवान, अशोक जसवाणी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ.चेतना संजय शर्मा यांच्यासह पक्षाचे सर्व उमेदवारांनी श्रीक्षेत्र बरसाना येथील परमपूज्य श्री काका माऊली व नाना माऊली यांच्या समाधीचे पुजन करुन दर्शन घेतले. तद्नंतर प्रभाग क्र. 1 मधील प्रतिष्ठीत नागरिक मोहनराव कुलकर्णी यांच्या हस्ते नारळ फोडून जय गुरू काका-जय गुरू नाना चा  जयघोष करुन प्रचाराला जल्लोषात शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रभाग क्रं.1 मधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नगरसेवक पदाची निवडणुक लढविणाऱ्या सौ.प्रांजली प्रशांत धोटे यांनी अमृत नगर, दीपाली नगर, विठ्ठल नगर, हनुमान नगर, लक्ष्मीनारायण नगर या परिसरातील नागरीकांच्या घरोघरी भेट देत मतदान रुपी आशीर्वाद मागितले.या प्रचार रॅलीला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ.चेतना शर्मा , सौ.प्रांजली धोटे यांचे प्रभाग क्रं.1 मधील नागरीक आणि महिला भगिणींनी ठिक-ठिकाणी औक्षण करुन आशिर्वाद दिले. या प्रचार रॅलीमध्ये गणेश नारखेडे, ऋषीकेश वाघोडे,संतोष टाले,मकरंद कोरडे,हरिश पंचभुते,श्रीपाद देशपांडे,ऋषीकेश देशमुख, भुवनेष कुळकर्णी, समाधान कोरडे, मनोहर धिमीते, संजय गावंडे,प्रताप कदम,सत्तु शर्मा,सतिष तिवारी,पंकज पुरी, बंटी मोरजाणी,निलेश तासतोडे, अभय गोडबोले,राजेश वसंधानी, दादाराव चोपडे,विष्णु गवई,गोपाल बोबडे,अभिषेक जुनघरे, ओम भागदेवाणी,प्रविण व्यवहारे, निलेश गव्हाळ,मनिष नागराणी,रितेश नागराणी,अक्षय वाबळे,जगन्नाथ राऊत,धिरज मिश्रा,संतोष गायकवाड,रुपेश बकाल,धनंजय शेगोकार यांच्यासह प्रभाग क्रं.1 मधील शेकडो नागरीक व महिला भगिणी उपस्थित होत्या.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.