*💥प्रारूप स्वरूपातील मतदार यादी प्रसिद्धी साठी उपलब्ध☀️*
*💥प्रारूप स्वरूपातील मतदार यादी प्रसिद्धी साठी उपलब्ध☀️*
खामगाव
(संतोष आटोळे)
खामगांव पंचायत समिती क्षेत्रातील सर्व नागरिकांना मा.राज्य निवडणूक आयोग यांचे आदेश नुसार खामगाव तहसील अंतर्गत दिनांक २३-०९-२०२५ नुसार बुलढाणा जिल्हा परिषद व खामगांव पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत अधिसूचित केलेल्या दिनांक ०१-०७-२०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधान सभेच्या मतदार यादी वरुन तयार करण्यांत आलेली खामगांव तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निहाय मतदार यादीची प्रारुप स्वरुपातील मतदार यादी प्रसिध्द करण्यांत आली आहे.
परिक्षणा करीता सदर यादी निवडणूक विभागाच्या तहसिल कार्यालय खामगांव येथे कार्यालयीन वेळेत उपलव्ध ठेवण्यात आली आहे कोणतीही हरकत अथवा सुचना असल्यास ती निर्वाचन विभाग तहसिल कार्यालय खामगांव येथे दिनांक १४-१०-२०२५ पर्यत कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात दाखल करावीत.
असं खामगाव तहसीलदार सुनील पाटील यांनी कळविलेले आहे
Comments
Post a Comment