सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगाव येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी
सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगाव येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी
(शेगांव ) स्थानिक वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचालित सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगाव येथे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सरदार पटेल यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी भाषणे, कविता सादर करून वातावरण देशभक्तीमय केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत जी कुलकर्णी होते. तसेच तंत्रनिकेतन प्राचार्य प्रा. प्रीती चोपडे, डॉ. पी. व्ही. पिंगळे, प्रा. धीरज वानखडे, प्रा सचिन इंगळे,प्रा पूजा दळवी प्रा कुकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वक्त्यांनी सरदार पटेल यांच्या नेतृत्वगुणांबद्दल, अखंड भारत निर्मितीत त्यांच्या योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना प्रेरक माहिती दिली.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी “राष्ट्रीय एकता दिवस” म्हणून एकात्मतेची शपथ घेतली आणि “Ek Bharat – Shreshtha Bharat” या घोषवाक्याचा जयघोष केला. त्यानंतर महाविद्यालय परिसरात स्वच्छता व विविध उपक्रम राबवून एकतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आकांक्षा पारस्कर हिने केले तर आभार प्रदर्शन प्रा. सागर सोनोने यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. सागर सोनोने, प्रा. राजेश महाजन आणि महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. माधुरी क्षीरसागर यांनी केले.
या यशस्वी उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सागरदादा फुंडकर तसेच उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री अँड. आकाशदादा फुंडकर यांनी सर्व प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी आणि एन एस एस स्वयंसेवकांचे अभिनंदन केले.
Comments
Post a Comment