हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंहजी यांनी अडचणींवर मात करत पराक्रमाने इतिहास घडविला....माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा एक दिवा महाराणाजींसाठी कार्यक्रमप्रसंगी सानंदांनी केली दिव्यांगांसोबत दिवाळी साजरी
हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंहजी यांनी अडचणींवर मात करत पराक्रमाने इतिहास घडविला
....माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा
एक दिवा महाराणाजींसाठी कार्यक्रमप्रसंगी सानंदांनी केली दिव्यांगांसोबत दिवाळी साजरी
....माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा
एक दिवा महाराणाजींसाठी कार्यक्रमप्रसंगी सानंदांनी केली दिव्यांगांसोबत दिवाळी साजरी
खामगाव ः- हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह हे एक आदर्श राजे होते.त्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत देश धर्माच्या रक्षणासाठी जे कार्य केले त्याला इतिहासात तोड नाही.कितीही मोठे संकट आले तर त्याचा हिंमतीने मुकाबला करावा याची शिकवण महाराणाजींनी आपल्या आचरणातुन दिली.हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह यांनी अडचणींना न घाबरता पराक्रमाने इतिहास घडविला. राणाजींचा इतिहास लोकांना ज्ञात व्हावा व सर्व नागरीकांमध्ये देश,धर्म व राष्ट्रविषयी प्रेम निर्माण व्हावे यासाठी एक दिवा महाराणाजींसाठी हा उपक्रम राबविला जात आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.दि.23 ऑक्टोंबर 2025 रोजी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी राणा फाऊंडेशनच्या वतीने टॉवर चौकातील राजीव गांधी उद्यान येथे एक दिवा महाराणाजींसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान दिव्यांग महिला भगिणींना साडी व मिष्ठान्न व दिव्यांग बांधवांना फराळा पाकीट देवुन त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करण्यात आली त्यावेळी बोलतांना त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा,माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वपालसिंह जाधव,राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरअध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज वानखडे,खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे, लायसन कमिटी सभापती विलाससिंग इंगळे,विराज मल्टीपर्पज फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज नगरनाईक, विदर्भ हौशी कबडड्ी असो.चे सचिव अशोकबाप्पु देशमुख,महेंद्रसिंग राठोड,केशव कापले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. समाजऋण फेडण्यासाठी राणा फाऊंडेशनच्या वतीने दिव्यांग सेवा हीच खरी ईश्वरसेवा असे माणुन,मानवता धर्म जोपासुन दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी करुन दिव्यांग बहिणींना भाऊबीजेची भेट देवुन त्यांच्या चेहऱ्यावर स्मीत हास्य आणण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे सानंदांनी सांगितले व प्रकाशाचा हा पर्व सर्वांसाठी सुख,समाधान व उत्कर्षाचा जावो अशी प्रार्थना करुन उपस्थितांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वपालसिंह जाधव यांनी आपल्या भाषणातुन हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पराक्रमाबदद्ल उपस्थितांना माहिती दिली. माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा हे समाजऋण फेडण्यासाठी 1992 पासुन अनेक महापुरुषांची जयंती,पुण्यतिथी साजरी करण्यासोबतच अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवीत असुन त्यामध्ये त्यांनी कधीही खंड पडु दिला नाही.दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याची संकल्पना सुध्दा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा हे दरवर्षी सातत्याने राबवित आहे असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विराज मल्टीपर्पज संघटनेचे अध्यक्ष मनोज नगरनाईक यांनी आपल्या भाषणातुन सांगितले की, लोकनेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा हे मागील काही वर्षापासुन दिव्यांग बांधव-भगिणींसोबत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम राबवित आहे. दरवर्षी दिवाळीनिमित्त दिव्यांग बांधवांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांच्याकडुन असे कार्यक्रम होत असतात. आपण याचे साक्षीदार आहोत, दिव्यांग बांधवांचे अनंत अडचणी आहेत त्या अडचणी सुध्दा सोडविण्यासाठी सानंदा साहेब सदैव तत्पर असतात व दिव्यांग बांधवांना न्याय देतात असे सांगुन हा अतिशय चांगला उपक्रम राबविल्याबदद्ल त्यांनी दिव्यांग बांधवांच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचे मनापासुन आभार मानले.
सर्वप्रथम माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा,माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा यांच्या हस्ते पादुका पुजन करण्यात आले. तद्नंतर राणा दिग्वीजयसिंह सानंदा यांच्या हस्ते हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारुढ पुतळयाचे पुजन करुन माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांनी हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारुढ पुतळयासमोर दिवे लावुन महाराणाजींच्या शौर्याला नमन केले.
या कार्यक्रमप्रसंगी शत्रुघ्न इंगळे या दिव्यांग बांधवाचा वाढदिवस असल्यामुळे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा व माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा यांनी त्यांचे कुकुंम तिलक लावुन औक्षण केले व लाडु भरवुन त्यांचे तोंड गोड केले व याप्रसंगी केक कापुन शत्रुघ्न इंगळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा व माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा यांच्या हस्ते दिव्यांग महिला भगिणींना भाऊबिजेची भेट म्हणुन साडी व मिष्ठान्न वाटप करण्यात आले. तसेच दिव्यांग बांधवांना सुध्दा दिवाळीनिमित्त फराळ भेट देण्यात आले.
यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा,माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी सुध्दा दिव्यांग बांधवांसोबत फटाक्यांची नयनरम्य आतिषबाजी करुन दिवाळी साजरी केली. यावेळी जब तक सुरज चांद रहेंगा-राणा तेरा नाम रहेंगा, एक दिया महाराणाजी के नाम, हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह की जय, हम सब एक है,दिव्यांग शक्तीचा विजय असो अश्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे बहारदार सुत्र संचालन पंजाबरावदादा देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन तालुकाअध्यक्ष मनोज वानखडे यांनी मानले.
या कार्यक्रमाला माजी नगरसेविका सौ.गिता महातो, सौ.शारदा शर्मा,सौ.तृप्ती गोडबोले,रोहित राजपुत,मुन्ना बोंद्रे,कृष्णा नाटेकर,सलीमभाई पत्रकार,अजय ठाकुर,प्रताप कदम,सत्तु शर्मा,निलेश बोराडे,अमोलसिंह ठाकुर,संतोष महातो, प्रमोदसिंह राजपुत,कैलाससिंग राजपुत, प्रफुल कुळकर्णी,निखील राठोड,करण राजपुत,सुरेंद्र चव्हाण,सतीष तिवारी,सुरेश बोरकर, श्याम मोरे,आनंद किलोलीया,शुभम मिश्रा,धनंजय वानखडे,अभिषेक जुनघरे,अरविंद ढगे,गणेश राजपुत, पिंटु जाधव,वसंता चिखलकर,हमीद खान,शत्रुघ्न इंगळे,पद्माकर धुरंदर, मिलींद धुरंदर,वैभव वानखडे,गोपाल क्षिरसागर,अंजुम पठान,सैयद इमरान,अजिजभाई चायवाले, शेख अजीम कुरेशी,मुकदद्र खान यांच्यासह सकल राजपुत समाज बांधव व सर्व जाती धर्मातील दिव्यांग बांधव-भगिणी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment