आदिवासी पारधी समाज बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबध्द .....मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा भाऊबिजेच्या दिवशी अटाळी येथील पारधी वस्तीतील महिला भगिणींसोबत सानंदांनी केली दिवाळी साजरी

आदिवासी पारधी समाज बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबध्द .....मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा भाऊबिजेच्या दिवशी अटाळी येथील पारधी वस्तीतील महिला भगिणींसोबत सानंदांनी केली दिवाळी साजरी
 खामगाव ः- दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. समाजातील उपेक्षित घटकांसोबत हा सण साजरा करुन त्याचा आनंद लुटता यावा म्हणुन दरवर्षी भाऊबिजेच्या दिवशी आदिवासी पारधी वस्तीमध्ये महिला भगिणींसोबत दिवाळी साजरी करतो.मागील अनेक वर्षापासुन हा उपक्रम निरंतरपणे सुरु आहे. आदिवासी पारधी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आण्ाण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पारधी समाज बांधवांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव कटीबध्द आहो असे प्रतिपादन  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार  राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले. दि.24 ऑक्टोंबर 2025 रोजी दिवाळी सणानिमित्त भाऊबिजेच्या दिवशी खामगाव तालुक्यातील श्री क्षेत्र अटाळी येथील पारधी समाज  वस्तीमध्ये माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी महिला भगिणींसोबत दिवाळी व भाऊबिजेचा सण साजरा करुन त्यांचे आशिर्वाद घेतले त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,तालुकाअध्यक्ष मनोज वानखडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठनेते पंजाबरावदादा देशमुख, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे, लायसन कमिटी सभापती विलाससिंग इंगळे, माजी जि.प.सदस्य श्रीकृष्ण धोटे, महेंद्रसिंग राठोड,अटाळी ग्राम पंचायतच्या सरपंचा सौ.दुर्गा काटोले,उपसरपंच तौसीफ देशमुख, घारोड ग्राम पंचायतचे सरपंच वैभव ठाकरे, अटाळी ग्राम पंचायतचे माजी सरपंच डॉ.दिलीप काटोले, शिवाजीराव पांढरे,केशव कापले,श्याम मोरे, अंजुम पठान,अटाळीचे सर्कल प्रमुख जयराम मुंडाले आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की,शिक्षणाशिवाय समाजाची उन्नती होवु शकत नाही म्हणुन आदिवासी पारधी समाज बांधवांनी आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण द्यावे व व्यसनांना तिलांजली देवुन  आपले जिवनमावन उंचवावे.पारधी समाज बांधवांनी सार्वजनिक शौचालय, सिमेंट रस्ते,नाली यासह विविध विकासकामांची मागणी केली आहे.11 वर्षापासुन सत्तेमध्ये नसल्यामुळे आपण अटाळी परिसरामध्ये अपेक्षीत असा विकास करु शकलो नाही.परंतू सध्या अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सत्तेमध्ये आहोत. अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री असुन त्यांच्या माध्यमातून निधी आणुन आपल्या सर्व समस्या सोडविल्या जातील अशी ग्वाही सानंदांनी दिली व आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्राम पंचायतच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही अपप्रचाराला बळी न  पडता आपले प्रेम व आशिर्वाद हे धर्मनिरपेक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी असु द्या असे आवाहनही सानंदांनी केले. याप्रसंगी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातुन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख म्हणाले की,  राणा दिलीपकुमार सानंदा हे आमदार असतांना व आमदार नसतांना सुध्दा मागील 21 वर्षापासुन दरवर्षी भाऊबीजेच्या दिवशी अटाळी येथील महिला भगिणींसोबत दिवाळी व भाऊबीजेचा सण साजरा करुन त्यांच्यासोबत सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे काम सातत्याने करीत आहे.म्हणुन त्यांच्या पाठीशी  खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.   सर्वप्रथम राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह मान्यवरांचे पारधी तांडा वस्तीमध्ये आगमन झाले असता पारधी वस्तीतील महिला भगिणींनी ठिक-ठिकाणी रांगोळया काढुन,दिवे लावुन ओवाळणी करीत उत्स्फुर्त स्वागत केले.याप्रसंगी पारधी समाजाचे दैवत भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दिवाळी व भाऊबीजनिमित्त पारधी समाज महिला भगिणींना भाऊबिजेची भेट म्हणुन साडया व फराळांचे वाटप केले तर लहान बालकांना फराळ वाटप करुन त्यांच्यासोबत फटाक्यांची आतिषबाजी करुन दिवाळी साजरी करुन त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलविले.कार्यक्रमाचे संचालन पंजाबरावदादा देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन सर्कल प्रमुख जयराम मुंडाले यांनी मानले. याप्रसंगी भगवान बिरसा मुंडा की जय,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, राणा दिलीपकुमार सानंदा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,आले शंभर,गेले शंभर सानंदा साहेब एक नंबर अश्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला ब्रिजलाल पवार, संजय कदम, संजय पांडे, संजय काटोले,हरिश काटोले,श्रीकृष्ण ढबाले,संजय पाटील,शेख वाहेब,कडुबा पांढरे,शेख समीर,भगवान सुलताने,संतोष शेगोकार,अनिरुध्द धोटे,धम्मपाल हिवराळे,कैलास राऊत, हस्तकसिंग काळे,भानुदास चव्हाण,अविनाश भोसले,कॅनवल पवार,कैलास पवार,कटयारसिंग भोसले, परसराम पांडे, देविदास काळे,रतन काळे,सदाशिव काळे,विटाम काळे,मांगोसिंग भोसले,मोपीचंद पवार,नवलचंद पवार,जिवनसिंग पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते व पारधी समाज बांधव-भगिणी मोठया संख्येने उपस्थित होते

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.