टोल प्लाजा ची अरेरावी साठी केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव कंत्राटधारास देणार समज ऐन दिवाळीच्या हंगामात टोलप्लाझा वर वाहनधारकांना तात्काळत ठेवणे महागात पडणार !
टोल प्लाजा ची अरेरावी साठी
केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव कंत्राटधारास देणार समज ऐन दिवाळीच्या हंगामात टोलप्लाझा वर वाहनधारकांना तात्काळत ठेवणे महागात पडणार !खामगाव (शेखर तायडे)
बाळापुर- खामगाव रस्त्यावरील टोल प्लाजावर दोन कठळे बंद असल्यामुळे ऐन दिवाळीच्या हंगामात वाहनधारकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे.अनेक जणांचे अकोल्याला जातांना व येताना दवाखान्याचे काम असताना सुद्धा या ठिकाणी नागरिकांना अर्धा -पाऊण तास ताटकळत वाहने उभी केली जात आहे .त्यामुळे संबंधित कंत्राट दाराविरुद्ध टोल प्लाजा चालवणाऱ्या कर्मचारी विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी देशाचे केंद्रीय मंत्री नामदार श्री. प्रतापराव जाधव यांच्याकडे दूरध्वनीद्वारे बोलताना जेष्ठ पत्रकार संपादक श्री.योगेशभाऊ हजारे यांनी घटनास्थळावरुन आज दिनांक २६ ऑक्टोंबर २०२५ रोजी बोलतांना केली. केंद्रीय मंत्री महोदयांनी संबंधित कंत्रालदारास सूचना देऊन समज देऊ असे याप्रसंगी बोलताना सांगितले. या टोल प्लाजावर नेहमीच स्कॅनिंग होताना सुद्धा अडचणी जातात .अनेक वेळा स्कॅनिंग होत नसल्याने कित्येक वेळ तात्काळत रांगेत वाहने उभी असतात .त्यामुळे अशा कामचुकार- निकृष्ट दर्जाच्या टोल प्लाझा कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी सर्व वाहनधारकांकडून होत होती, या ठिकाणचे व्हिडिओ शूटिंग सुद्धा काढून ठेवले आहेत. नियमाप्रमाणे दोन मिनिटांच्या वर कोणत्याही वाहनधारकास टोल प्लाजावर अडवून ठेवता येत नाही. त्यामुळे टोल प्लाजा विरुद्ध गुन्हा दाखल सुद्धा होऊ शकतो हे ही तेवढेच खरे आहे. सोबतच लोकल वाहन धारकाकडून 25 किलोमीटरच्या आतील वाहनांधारंकाकडून सुद्धा येथे टोल घेतल्या जातो हे नियमात बसत नाही तरीसुद्धा नियम धाब्यावर बसून येथे नियमबाह्य वसुली सुरू आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नामदार श्री.प्रतापराव जाधव या प्रकरणात काय कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.
Comments
Post a Comment