श्री संत भोजने महाराज पुण्यतिथी महोत्सवाची उत्साहात सांगता माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी घेतले दर्शन व महाप्रसादाचा लाभ
श्री संत भोजने महाराज पुण्यतिथी महोत्सवाची उत्साहात सांगता
माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी घेतले दर्शन व महाप्रसादाचा लाभ
खामगाव ः
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या तालुक्यातील श्री क्षेत्र अटाळी येथील सदगुरु श्री संत भोजने महाराज संस्थान येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी प.पु.भोजने महाराज पुण्यतिथी महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताहाला गुरुवार दि.23 ऑक्टोंबर 2025 पासुन प्रारंभ झाला होता. या दरम्यान दररोज रात्री 8 ते 10 या वेळे दरम्यान महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तन कारांचे भव्य किर्तन सुध्दा पार पडले. या भव्य दिव्य पुण्यतिथी महोत्सवाची गुरुवार दि.30 ऑक्टोंबर 2025 भक्तीभावपुर्ण वातावरणामध्ये उत्साहात सांगता झाली.अखेरच्या दिवशी हजारो भाविक भक्त श्री क्षेत्र अटाळी येथे दाखल झाले होते.
खामगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी श्री क्षेत्र अटाळी येथे भोजने महाराज संस्थानमध्ये जावुन संत भोजने महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करुन व दर्शन घेतले. तद्नंतर संत भोजने महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेवुन अभिवादन केले. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख,तालुका अध्यक्ष मनोज वानखडे,खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे, संचालक श्रीकृष्ण टिकार, माजी जि.प.सदस्य श्रीकृष्ण धोटे,सर्कल प्रमुख जयराम मुंडाले,अनंता धामोडे,श्रीकांत देशमुख,अटाळीचे माजी सरपंच डॉ.दिलीप काटोले, सरपंचपती हरीष काटोले,संजय भिसे,सोपान काटोले,भगवान सुलताने,संजय काटोले,ब्रिजलाल पवार,मुरलीधर डिक्कर,परसराम पांडे यांच्यासह अटाळी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी श्री संत भोजने महाराज संस्थानतर्फे निवृत्ती महाले यांनी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचा शेला,टोपी व सन्मानचिन्ह देवुन सत्कार केला. पुण्यतिथी महोत्सवाच्या समारोप प्रसंगी दि.30 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत रामायणाचार्य,विदर्भरत्न हभप श्री संजय महाराज पाचपोर यांच्या काल्याचे किर्तन पार पडले. तद्नंतर नगर प्रदक्षिणा होवुन पुण्यतिथी महोत्सवानिमित्त हजारो भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह उपस्थित मान्यवरांनीही या महाप्रसादाचा लाभ घेतला. पंचक्रोशीतील विविध गावातुन आलेल्या सेवेकऱ्यांच्या चमुने शिस्तबध्द पध्दतीने हजारो भाविकांना पंगतीमध्ये महाप्रसादाचे वितरण करुन सेवा दिली.
Comments
Post a Comment