सामाजिक सेवाभाव जोपासणारे श्री ओम जगदंबा उत्सव मंडळ ..भव्य महाप्रसाद , आरोग्य शिबिर ,. क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम सुंदर आयोजन
सामाजिक सेवाभाव जोपासणारे श्री ओम जगदंबा उत्सव मंडळ ..
भव्य महाप्रसाद , आरोग्य शिबिर ,. क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम सुंदर आयोजन..
खामगाव .
श्री ओम जगदंबा उत्सव मंडळ अमृत नगर जलम रोड खामगाव या परिसरात मागील 25 वर्षापासून मोठी देवी शांती उत्सव मोठ्या हर्ष उल्हासाने साजरा केल्या जात असतो त्यामध्ये मुख्य म्हणजे शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते रोज मातीची आरती होत असते आरती खूपच महत्त्व असल्याने शहरातील अगदी दूर दूर परिसरातून भाविक भक्तांची मोठी गर्दी असते तसेच नऊ दिवस सांस्कृतिक क्रीडा कार्यक्रम, भजन कीर्तन प्रवचन याचेआयोजन असते यावर्षी दरवर्षीप्रमाणे भव्य रक्तदान शिबिर दि. 12-10 रोजी पार पडले यावेळी कॅबिनेट कामगार मंत्री आकाश दादा फुंडकर हे प्रामुख्याने उपस्थित होते
तसेच रोटरी क्लब खामगाव सिल्वर सिटी खामगाव व श्री ओम जगदंबा उत्सव मंडळ यांच्या संयुक्त उपक्रमाने भव्य आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले यामध्ये दहा वरून अधिक व्यक्तींचे मोतीया बिंदूचे ऑपरेशन फक्त चारशे रुपये करण्यात येणार आहे तसेच 13 ता.होम पूजन व भव्य महाप्रसाद वितरण करण्यात आले यावेळी भावी भक्तांची प्रचंड गर्दीत होती मंडळाचे सर्व सेवाभावी सांस्कृतिक महाप्रसाद वितरण कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांची परिसरातील भावी भक्तांचे अमूल्य असे योगदान असते श्री ओम जगदंबा उत्सव मंडळ एक सामाजिक सेवाभाव जोपासणारे मंडळ असून मंडळाचे सर्व दूरपर्यंत नाव लौकिक आहे
Comments
Post a Comment