श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सव संपन्न! सविस्तर बातमी
श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सव संपन्न!
शांतिनिकेतन विद्यामंदिर, सांगलीने पटकावले प्रथम पारितोषिक
पार्ले टिळक विद्यालय, मुंबई – द्वितीय; न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी – तृतीय
अमरावती, दि. २८ ऑक्टोबर २०२५ —
राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद (NCSM), कोलकाता आणि नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई यांच्या सहकार्याने, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे; राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण), नागपूर; विभागीय शिक्षण उपसंचालक, अमरावती विभाग; जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अमरावती आणि डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सव २०२५-२६ श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीच्या सर सी. व्ही. रमण सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडला.
या नाट्योत्सवात विज्ञान, कला आणि नाट्याचा अप्रतिम संगम दिसून आला — वैज्ञानिक संकल्पना सादर करताना विद्यार्थ्यांच्या कलात्मक उर्जेची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवता आली.
उद्घाटन सोहळा:
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री हर्षवर्धनजी देशमुख, अध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था यांनी भूषवले. उद्घाटन मा. सौम्या शर्मा चांडक (भा.प्र.से.), आयुक्त, अमरावती महानगरपालिका यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. हर्षलता बुराडे, संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांनी सादर केले तर डॉ. जी. व्ही. कोरपे, प्राचार्य, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय यांनी स्वागतपर भाषण केले.
उद्घाटनपर भाषणात मा. सौम्या शर्मा चांडक यांनी विज्ञान आणि कलेच्या संयोगातून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मुख्य अतिथी मा. संजिता महापात्र (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत “प्रत्यक्ष जीवनातील अनुभवातून शिकणे हेच खरे शिक्षण आहे,” असे सांगून विद्यार्थ्यांना विज्ञान आणि कलेच्या माध्यमातून आपले भवितव्य उज्ज्वल घडविण्याचे आवाहन केले.
प्रमुख उपस्थिती मा. श्री. अनिल साबळे, विभागीय अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, अमरावती विभाग यांनी विद्यार्थ्यांना नाटकाच्या माध्यमातून समाजोन्नतीसाठी विज्ञानाचे तत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात मा. श्री हर्षवर्धनजी देशमुख यांनी शासनाने श्री शिवाजी शिक्षण संस्थेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, या नाट्योत्सवामुळे संस्थेच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला नवीन दिशा मिळाली असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे भाऊसाहेब देशमुख यांचे स्वप्न साकार होत आहे.
अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमधून सहभाग घेऊन व्यक्तिमत्व विकास साधावा, यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या सोहळ्याला डॉ. व्ही. जी. ठाकरे, सचिव, श्री शिवाजी शिक्षण संस्था यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे संचलन डॉ. दिनेश खेडकर यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. पंकज नागपुरे, राज्यस्तरीय नाट्योत्सव समन्वयक यांनी केले.
स्पर्धेतील सहभाग आणि परीक्षण
या राज्यस्तरीय नाट्योत्सवात महाराष्ट्रातील आठ विभागांमधील आठ विजेत्या चमूंचा सहभाग होता. परीक्षक म्हणून प्रख्यात लेखक-दिग्दर्शक डॉ. चंद्रकांत शिंदे, ज्येष्ठ रंगकर्मी प्राचार्य राजाभाऊ दखणे आणि प्रा. डॉ. दिनेश खेडकर यांनी जबाबदारी पार पाडली.
सहभागी संघ:
लातूर विभाग – सरस्वती विद्यालय, तामलवाडी (धाराशिव); पुणे विभाग – न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी; अमरावती विभाग – प्रभात किड्स स्कूल, अकोला; मुंबई विभाग – पार्ले टिळक विद्यालय (इंग्रजी माध्यम), विलेपार्ले; नाशिक विभाग – जनता विद्यालय, लोहोणेर (देवळा, नाशिक); मराठवाडा विभाग – संस्कार प्रबोधिनी विद्यालय, कमळापूर (गंगापूर, छत्रपती संभाजीनगर); कोल्हापूर विभाग – शांतिनिकेतन विद्यालय, सांगली; नागपूर विभाग – नूतन कन्या शाळा, भंडारा.
नाट्यविषय आणि कलाविष्कार:
या वर्षीच्या नाट्योत्सवाचा मुख्य विषय होता — “मानवकल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान”, तर उपविषयांत हरित तंत्रज्ञान, स्मार्ट शेती, डिजिटल भारत जीवन सक्षमीकरण, स्वच्छता की दिंडी, सक्षम भारत इत्यादींचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी “रिश्ता वही सोच नयी,” “किंजा इनफाइनाईट,” “कमला तुसी ग्रेट हो,” “स्मार्ट ॲग्रीकल्चर” यांसारख्या सर्जनशील नाट्यप्रयोगांद्वारे विज्ञानाचा सामाजिक उपयोग प्रभावीपणे मांडला.
बक्षीस वितरण:
सांघिक प्रथम पारितोषिक: शांतिनिकेतन विद्यामंदिर, सांगली — रिश्ता वही सोच नयी
सांघिक द्वितीय पारितोषिक: पार्ले टिळक विद्यालय, मुंबई — कमला तुसी ग्रेट हो
सांघिक तृतीय पारितोषिक: न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी — किंजा इनफाइनाईट
वैयक्तिक पारितोषिके:
उत्कृष्ट अभिनेत्री: केतकी सुनील चव्हाण (शांतिनिकेतन विद्यालय, सांगली)
उत्कृष्ट अभिनेता: रुद्र श्रीमांदिलकर (न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी)
उत्कृष्ट पटकथा: डॉ. विज्ञापन गोकर्णकर (पार्ले टिळक विद्यालय, मुंबई)
उत्कृष्ट दिग्दर्शन: श्री संजय बामणे (शांतिनिकेतन विद्यालय, सांगली)
या नाट्योत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. पंकज नागपुरे, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. संगीता इंगोले, डॉ. राजकुमार अवसारे, श्री लक्ष्मीकांत बांते, तसेच राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूरचे पदाधिकारी आणि श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले. डॉ. आर. पी. अवसरे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. या राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सवामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या नाट्यगुणांना नवे व्यासपीठ लाभले असून, अमरावतीच्या सांस्कृतिक दालनात विज्ञान आणि कलेच्या संगमाचं एक तेजस्वी पान जोडले गेलं आहे
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment