खामगाव नगर परिषद संदर्भात शिवसेनेची महत्वाची बैठक संपन्न
खामगाव नगर परिषद संदर्भात शिवसेनेची महत्वाची बैठक संपन्न
खामगाव (संतोष आटोळे)
शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री.एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशावरून होवु घातलेल्या आगामी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खामगाव, येथे
*केंद्रीय मंत्री मा.प्रतापरावजी जाधव साहेब* यांच्या
*अध्यक्षतेखाली*
दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी *हॉटेल तुळजाई खामगांव*
येथे महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा सह संपर्क प्रमुख श्री शांताराम दाणे, जिल्हा प्रमुख श्री संतोषभाऊ डिवरे पाटील हे उपस्थित होते.
सर्व प्रथम छ. शिवाजी महाराज, हिंदु हदय सम्राट, शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर श्री आनंद दिघे यांचे प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना तालुका प्रमुख श्री राजेंद्र बघे यांनी केले.
यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संतोष डिवरे पाटील, जिल्हा सह -संपर्कप्रमुख श्री शांताराम दाणे
यांनी मार्गदर्शन केले यानंतर केंद्रीय मंत्री नामदार साहेब यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांना येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकी संदर्भात योग्य ते मार्गदर्शन केले येणाऱ्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन केले. तसेच खामगाव खामगाव शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
करण्यात आल्या त्यामध्ये शिवसेना शहर समन्वयक डॉ अभिजीत महानकर,शहर संघटक श्री उमेश (तब्बू ) तायडे, श्री आदर्श आनंदे,शिवसेना उपशहर प्रमुख श्री भाऊ बिडकर, विकी खराडे,बाळू खडसे पाटील, विकास जवंजाळ, आनंद चिंडाले,करण छापरवाल,रोहित सुकाळे, राहुल ठोंबरे,सौरभ शिंदे,योगेश देशमुख, विभाग प्रमुख पदी श्री अरविंद ठोंबरे, गगनजीत सिंग मेहरा, श्री बंटी पवार,विकी तराळे,गोविंद पवार,मोहन शिंदे,राम झुवर,अजिंक्य जाधव,सचिन सुरोसे,सुनील माळवंदे, उमेश पराडे, गणेश तायडे, विरल चुनेकर, हर्ष जगताप,आनंद पवार, सचिन सुरोसे, विक्की डाबेराव यांची नियुक्ती करण्यात आली.
खामगाव शहरातील सर्व परिचित भावी नगर सेविका निर्मलाताई किसन हेलोडे यांनी जाहीर प्रवेश केला.
या बैठकीत शिवसेना उपजिल्हा प्रमुख, श्री संजय अवताडे,श्री राजेंद्र बघे, शहर प्रमुख श्री चेतन ठोंबरे, युवासेना शहर प्रमुख श्री राहुल कळमकार, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख सौ कावेरी ताई वाघमारे, शहर प्रमुख सौ वैशालीताई घोरपडे, तालुका प्रमुख सौ जयश्री ताई देशमुख, कामगार सेनेचे विदर्भ प्रमुख श्री शिवाभाऊ विटे, कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख श्री निलेश बोरे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख श्री धिरज कंठाळे, विद्यार्थी जिल्हा सह प्रमुख श्री नितेश खरात, सोशल मीडिया जिल्हा सह संपर्क प्रमुख श्री सोपान वाडेकर,युवासेना माजी उपजिल्हा प्रमुख श्री निलेश देवताळू, वैद्यकीय मदत कक्ष तालुका प्रमुख श्री आनंद सारसर, श्री शुभम मोरे, श्री करण बहुनिया, श्री विक्की सारवान, श्री पंकज अंबारे, माजी शिवसेना शहर प्रमुख श्री सुनील अग्रवाल, ऍड श्री रमेश भट्टड,विक्की धारपवार, सागर जामोदे सचिन सुरोसे , श्री विष्णु भाऊ कदम श्री गोपाल भिल यांचेसह पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment