जागृती क्रीडा मंडळ व दत्तगुरु गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने जगदंबा विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण घाटपुरी नाका परिसरात हजारो भाविक भक्तांनी घ्ोतला महाप्रसादाचा लाभ
जागृती क्रीडा मंडळ व दत्तगुरु गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने जगदंबा विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण घाटपुरी नाका परिसरात हजारो भाविक भक्तांनी घ्ोतला महाप्रसादाचा लाभ.
खामगाव (संतोष आटोळे)
जागृती क्रीडा मंडळ व दत्तगुरु गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने जगदंबा विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण
घाटपुरी नाका परिसरात हजारो भाविक भक्तांनी घ्ोतला महाप्रसादाचा लाभ.
खामगांव ः-शांती उत्सव म्हणून ओळखल्या जाणारा मोठया देवीचा जगदंबा उत्सव खामगाव शहर व परिसरात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. मागील दहा दिवसापासुन ठिक-ठिकाणी मंडळांकडुन जगदंबा देवीची स्थापना करुन मोठया भक्तीभावात पुजा-अर्चा करण्यात आली. जगदंबा उत्सवाच्या शेवटच्या दिवशी गुरुवार दि.17 ऑक्टोंबर 2025 रोजी आई राध्ाा उदो-उदो च्या गजरात मोठया देवीची विसर्जन मिरवणुक काढुन देवीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी हजारो भाविक भक्त विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.
जलालपुरा भागातून दुपारी 12 वाजताच्या सुमारास मोठया देवीची पुजा-अर्चा करुन आरती करण्यात आल्यानंतर देवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. ही विसर्जन मिरवणूक पुरवार गल्ली, शिवाजी वेस भागातून घ्ााटपुरी नाका परिसरात पोहोचली असता याठिकाणी दरवर्ष्ाी प्रमाणे याहीवर्ष्ाी जागृती क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळ व दत्तगुरु गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने जगदंबा विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या भाविक भक्तांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा,सौ.सवितादेवी सानंदा, केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्टचे असो.चे सचिव अनिलभाऊ नावंदर,माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोज वानखडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख,माजी नगरसेवक ओमभाऊ शर्मा,विदर्भ हौशी कबडड्ी असो.चे अशोकबाप्पु देशमुख,सुरेंद्र पवार,सुनिल मानकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम घ्ााटपुरी नाका परिसरात मोठया देवीचे आगमन झाले असता जागृती क्रिडा मंडळाच्या वतीने फटाक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात आली यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते मोठया देवीची आरती करण्यात आली.तद्नंतर जागृती क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित महाप्रसाद वाटपाचा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. अतिशय नियोजनबध्द व शिस्तीमध्ये देवीच्या मिरवणुकी सहभागी झालेल्या हजारो भाविकांना पोळी-भाजी व मसाला भात चे वितरण करण्यात आले.
यावेळी जागृती क्रिडा मंडळाच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा व उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी जागृती क्रिडा मंडळ व दत्तगुरु मंडळाच्या वतीने मागील अनेक वर्षापासुन जगदंबा विसर्जन मिरवणुकीमध्ये हजारो भाविकांना महाप्रसाद वितरणाचा विध्ाायक उपक्रम राबविला जात आहे. या महाप्रसादाच्या कार्यक्रमातुन मंडळाचे कार्यकर्ते हे लोकसहभाग आणि सहकार्याने महाप्रसादाचा उपक्रम राबवितात असे सांगुन त्यांनी मंडळाच्या पदाध्ािकाऱ्यांचे कौतुक केले व हा उपक्रम इतर मंडळांसाठी सुध्दा अनुकरणीय उपक्रम आहे असे त्यांनी सांगितले.
महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओम भाऊ शर्मा ,सुनील मानकर ,सुरेंद्र पवार, दिलीप पातुरकर, दिनेश गोडाळे, अनिल चव्हाण, गोलू तायडे ,बंटी वानखडे, नाना चिकटे, संदीप भरडक राजेश हुरसाळ, रवि भोवरे,अजय जैन,प्रशांत खर्चे ,गोकुळ मोरखडे ,राहुल सापदरे, अंकुश हेड पाटील यांच्यासह जागृती क्रिडा मंडळ व दत्तगुरु मंडळाच्या पदाध्ािकारी,कार्यकर्ते व जोशी नगर भागातील नागरीकांनी परिश्रम घ्ोतले
Comments
Post a Comment