दर्जेदार खेळ करुन बुलडाणा जिल्हा कबडडी संघाचा नावलौकीक उंचवावा ....माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा श्री शिवाजी व्यायाम मंदिर येथे आयोजित बुलढाणा जिल्हा कबडड्ी ी निवड चाचणी स्पर्धेत 395 कबडडीपटूंनी घेतला सहभाग
दर्जेदार खेळ करुन बुलडाणा जिल्हा कबडडी संघाचा नावलौकीक उंचवावा ....माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा
श्री शिवाजी व्यायाम मंदिर येथे आयोजित बुलढाणा जिल्हा कबडड्ी ी निवड चाचणी स्पर्धेत 395 कबडडीपटूंनी घेतला सहभाग
खामगाव ः- कबडडी हा मैदानी व मर्दानी खेळ आहे.कबडडी खेळामध्ये कुशाग्र बुद्धी,शारीरीक चपळता आवश्यक असते. जिदद् व चिकाटीने सरावात सातत्य ठेवल्यास अनेक कबडड्ी स्पर्धांच्या माध्यमातून कबडड्ी क्षेत्रामध्ये उज्वल भविष्य नक्कीच घडविता येते . बुलढाणा जिल्हयातील खेळाडुंनी जय-पराजयाची चिंता न करता सांघीक वृत्तीने दर्जेदार खेळ करुन बुलडाणा जिल्हा कबडडी संघाचा नावलौकीक उंचवावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.सर्व सिनिअर पुरुष व महिला तसेच ज्युनिअर व सबज्युनिअर 18 वर्षाच्या आतील व सबज्युनिअर मुले व मुली यांच्या विदर्भराज्य अजिंक्यपद कबडड्ी स्पर्धा तुमसर,जि.भंडारा व अकोला येथे आयोजित करण्यात आले आहे त्या अनुषंगाने रविवार दि.26 ऑक्टोबर 2025 रोजी श्री शिवाजी व्यायाम मंदिर,पुरवार गल्ली, खामगाव येथे बुलढाणा जिल्हा कबडडी संघाची निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी ते बोलत आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासणे, तालुकाअध्यक्ष मनोज वानखडे,विदर्भ हौशी कबड्डी असो.चे सचिव अशोककबाप्पु देशमुख,जय गुरुदेव शिक्षण संस्थ घोडप चे गजाजन कोल्हे, प्राचार्य माहूरकर सर, दादाराव हेलोडे, सुधाकर खासने, महावीर थानवी, जगदीश सोनी, गणेश मानेकर, मनोहर बदरखे, अरुण गायगोळ आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी शक्तीची देवता बजरंगबलीची माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा व मान्यवरांच्या हस्ते पुजन व आरती करण्यात आली व त्यानंतर माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून व नारळ फोडून कबडडी निवड चाचणी स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. आयोजकांच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा,माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल ,श्रीफळ व पुष्पहार देउन सत्कार करण्यात आला.निवड चाचणी स्पर्धेला कबडडी पटुंचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.या निवड चाचणी स्पर्धेला जिल्हयातील ज्युनिअर, सब ज्युनिअर सिनिअर पुरुष आणि महिला गटातून एकूण 395 कबडडी पटुंनी सहभाग घेतला. स्पर्धेचे पंच म्हणुन गजानन राऊत, विपीन हटकर, वसंता उटाळे, दिनेश चंदेल, अशोक ढिसले, चरणसिंग राजपूत यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे संचालन बाळू पाटील सर देऊळगाव मही यांनी तर आभार विदर्भ हौशी कबडड्ी असो.चे सचिव अशोकबाप्पू देशमुख यांनी केले.हि निवड चाचणी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शुभम पाटील, सुरज धोपटे, आकाश प्रयाल, जितेंद्र पाटील, शैलेष देशमुख, धंनजय खराटे, रचित उपाध्याय , प्रसाद नटकुट, निखिल जाधव, गणेश मुनोत, गोलू पाटील, रवी ठोसर, विशाल शेवाळे यांच्यासह श्री शिवाजी व्यायाम मंदिराचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.बुलढाणा जिल्हा कबडड्ी स्पर्धेमध्ये निवड झालेल्या खेळाडूंचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बुलढाणा जिल्हा कबडड्ी संघ 30 ऑक्टोंबर रोजी भंडारा येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी रवाना होणार आहे
Comments
Post a Comment