यश अखेर चिखली येथे दिव्यांग 👩🏼🦽बोर्ड सुरू करण्याची मिळाली मान्यता💥**तर बोर्डाचे विकेंद्रीकरण करत दिव्यांगांना न्याय देऊ* - डॉक्टर बिराजदार🩺💥
*💥💥दिव्यांग शक्तीच्या मागणीला यश अखेर चिखली येथे दिव्यांग 👩🏼🦽बोर्ड सुरू करण्याची मिळाली मान्यता💥*
*तर बोर्डाचे विकेंद्रीकरण करत दिव्यांगांना न्याय देऊ* - डॉक्टर बिराजदार🩺💥
चिखली {विशाल ईवरकर}:-
चिखली तालुक्यातील अपंग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिव्यांग शक्तीसाठी घेण्यात आला असून आता चिखली उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग बोर्डची सुविधा सुरु करण्यात आली आहे. यामुळे दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता जिल्हा स्तरावर म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे गरज नाही.
शासकीय सुविधांसाठी आवश्यक असलेले दिव्यांग प्रमाणपत्र आता थेट चिखलीतच मिळणार आहे. या करिता आमदार सौ. श्वेता महाले मा.आमदार विजयराज शिंदे यांचे सह दिव्यांग सेवा संस्था असलेल्या विराट मल्टीपर्पज फाउंडेशन व साप्ताहिक दिव्यांग शक्तीच्या माध्यमातून पाठपुरावा करीत जिल्हा शल्यचिकित्सकांना लेखी पत्र देऊन ही मागणी केली होती.
नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीची जाणीव ठेवून अखेर या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे. स्थानिक अपंग बांधवांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून दिव्यांग कल्याण आयुक्त विभाग पुणे व जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा यांनी दाखवलेल्या सकारात्मक पुढाकारामुळेच आज ही सुविधा चिखलीत उपलब्ध झाली," अशा भावना व्यक्त होत आहेत. दिव्यांग बोर्ड सह इतर आरोग्यदायी सुविधा प्राप्त झाल्यामुळे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सैय्यद उमर,
वैद्यकीय अधिकारी डॉ. रामानंद इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली
आरोग्य कर्मचारी व निष्णाद वैद्यकीय चिकित्सक लवकरच या बोर्डावर कार्यरत होतील चिखली उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध झालेली ही नवी सुविधा दिव्यांग बांधवांच्या
सुविधेसाठी मानसिक, शारीरिक व आर्थिक लाभ यातून मिळणार आहे
तर या तपासणी बोर्डामध्ये अस्थिरोग नेत्र मानसिक कर्णबधिर मूकबधिर आदींची तपासणी होणार आहे सतत आपल्या लेखणीतून पाठपुरावा करीत दिव्यांग शक्तीच्या माध्यमातून हे बोर्ड उपलब्ध झाल्यामुळे अनेक दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले आहे
तर यावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बिराजदार यांना अभिनंदन करीत घाटावरील बोर्डाचं विकेंद्रीकरण केल्यामुळे सर्वात जास्त असलेल्या बोगस अपंगांच्या तक्रारी यांचं निरसन होण्यास फार मोठी मदत होईल व वास्तविक दिव्यांगाना न्याय मिळेल असे दिव्यांग शक्ती संपादक मनोज नगरनाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले
Comments
Post a Comment