अग्रेसन महाराज अभिवादन बॅनरवर अपमानास्पद प्रकाराची पोलीसात तक्रार
अग्रेसन महाराज अभिवादन बॅनरवर अपमानास्पद प्रकाराची पोलीसात तक्रार
खामगाव : श्री अग्रेसन महाराज यांच्या छायाचित्र असलेल्या बॅनरवर अपमानास्पद प्रकार अज्ञात व्यक्तीने केल्याची तक्रार २३ सप्टेंबर रोजी शहर पोस्टेला सर्व समाज बांधवांच्या वतीने अध्यक्ष सुरज अग्रवाल व पदाधिकारी यांनी केली आहे.
श्री अग्रेसन महाराज जयंतीनिमित्त २१ सप्टेंबर २०२५ च्या रात्री कार्यक्रमाची रुपरेषा तयार करण्यात येत होती. त्यावेळी सदर बॅनरवर अज्ञात व्यक्तीने जाणुनबुजून धार्मिक भावना दुखावतील असा अपमानास्पद प्रकार करुन शांतता व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या कृत्याने समाजात मतभेद व तनाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीचा शोध घेवून कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली असून पोलीस विभागाकडून पुढील तपास सुरू आहे
Comments
Post a Comment