*आपत्तीत आर्थिक मदतीचा वसा घेतलेले माररगाव चे श्रीगुरुदेव आपत्ती व्यवस्थापन मंडळ*
*आपत्तीत आर्थिक मदतीचा वसा घेतलेले माररगाव चे श्रीगुरुदेव आपत्ती व्यवस्थापन मंडळ*
*खामगाव( संतोष आटोळे)*
समाजातील अपंग, निराधार, गरीब व गरजू लोकांना गरजेच्या वेळी आर्थिक मदत देण्याचे काम गत 5 वर्षापासून श्रीगुरुदेव आपत्ती व्यवस्थापन मंडळ माटरगाव बु तर्फे करण्यात येत आहे. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वितरण, वव्यसनमुक्ती मध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या आणि व्यसनातून मुक्त झालेल्या व्यक्तींचा सत्कार व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्याचे कार्य या मंडळातर्फे करण्यात येत आहे.मंडळाचे सदस्य हे कार्य करण्यासाठी कोणाच्याही समोर आर्थिक मदत स्वतःहून मागत नाही.व्यवस्थापन मंडळातील सदस्य हे आपल्या कमाईतून दरमहा आर्थिक रक्कम आपल्या इच्छेप्रमाणे देत आहे. दर महिन्याला जमा होणाऱ्या रकमेतून हे कार्य करण्यात येत आहे.
राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र गुरुकुंज मोझरी येथील आचार्य वेरुळकर गुरुजी प्रेरणेने अनंतराव आळशी, राजेश भुतडा, रामभाऊ दळवी , जुगलकिशोर गांधी ,राम देशमुख व सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून 20 ऑक्टोबर 2020 रोजी या मंडळाचा स्थापनेचा मुहूर्तमेढ श्रीगुरुदेव प्रार्थना मंदिर माटरगाव येथे रोवण्यात आली.यापूर्वी सुद्धा या मंडळातील लोक आपापल्या परीने वैयक्तिक मदत करत होते. खऱ्या अर्थाने संघटित रित्या हे काम 2020 पासून चालू झाले
जमा झालेली रक्कम बँकेत भरण्यात येते दर 3 महिन्यानंतर आपत्ती व्यवस्थापन मंडळाच्या सभेत जमाखर्चाचा हिशोब सादर करण्यात येतो.जमा झालेल्या रकमेतून गावातील आजारी व एखाद्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांबरोबरच अनाथ, अपंग, निराधार आणि ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यांना त्यांच्या गरजेच्या नुसाकोणत्याही प्रकारचा जातीभेद न करता आर्थिक मदत देण्यात येत आहे.आतापर्यंत या आपत्ती व्यवस्थापन मंडळ तर्फे अनेक लोकांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे.संकटकाळी कोणीतरी आपल्या पाठीशी उभे आहे याचा प्रत्यय या माध्यमातून त्यांना मिळत आहे.
*शैक्षणिक किटचे वितरण*
गत ४ वर्षापासून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक किटचे वितरण करण्यात येत आहे.दरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते त्या स्पर्धातील विजेत्या विद्यार्थ्यांना या मंडळातर्फे रोख बक्षिसे देण्यात येतात.व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तींचा शाल श्रीफळ टोपी संस्कारप्रदीप व आरो पाण्याची कॅन भेट रूपाने प्रोत्साहन पर देण्यात येते.
निराधार व अपंग व्यक्तींना ब्लॅंकेट व स्वेटर चे वितरण करण्यात आले आहे. कोरोना काळात आर्थिक परिस्थिती खालावलेल्या परिवारातील लोकांना किराणा सामान देण्यात आले.
*व्यसनमुक्त गाव करणारे मनीष गांधी यांचा सत्कार*
संग्रामपूर तालुक्यातील वानखेडे या गावातील शेकडो लोकांना व्यसनमुक्त करणारे मनीष गांधी यांचा 14 सप्टेंबर 25 रोजी श्रीगुरुदेव आपत्ती व्यवस्थापन मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या वेडी आपत्ती व्यवस्थापन मंडळ, ग्रामत्थ उपस्थित होते *श्री गुरुदेव आपत्ती व्यवस्थापन मंडळाचे संचालक असे* श्री गुरूदेव आपत्ती व्यवस्थापन मंडाळा मध्ये अनंतराव आळशी, रामभाऊ दळवी , विश्वनाथ गायकी, डॉ प्रमोद शुक्ला, राजेश भुतडा, गोपाळराव मिरगे,जुगलकिशोर गांधी,गजानन निखाडे, अशोक मोरे,प्रदीप मुंडे, अमोल सांगळे ठाणेदार, गोपाल राठी, देविदास जवरे,सुभाष निखाडे,श्रीकृष्ण कुलकर्णी,राम देशमुख यांचा समावेश आहे.
Comments
Post a Comment