ग्रामसेवक संघटनेचा अध्यादेश शासना पेक्षा मोठा नाही. ग्रामसेवक संघटनेच्या अध्यादेशाला त्वरित पाय बंद घालावा.*कामगारांना प्रमाणपत्र न दिल्यास ग्रामसेवकांच्या तोंडाला काळेफासू..* ॲड.सतीशचंद्र रोठे जिल्हा परिषद सीईओ गुलाबराव खरात यांच्या कारवाईकडे लक्ष.
ग्रामसेवक संघटनेचा अध्यादेश शासना पेक्षा मोठा नाही.
ग्रामसेवक संघटनेच्या अध्यादेशाला त्वरित पाय बंद घालावा.
*कामगारांना प्रमाणपत्र न दिल्यास ग्रामसेवकांच्या तोंडाला काळेफासू..*
ॲड.सतीशचंद्र रोठे
जिल्हा परिषद सीईओ गुलाबराव खरात यांच्या कारवाईकडे लक्ष..
बुलढाणा :
शासन नियमानुसार संपूर्ण जिल्ह्यात ग्रामसेवकाकडून कामगारांना नव्वद दिवसाच्या कामाचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक असताना ग्रामसेवक संघटनेकडून प्रमाणपत्र न देण्याचा काढलेला अघोषित अध्यादेश संघटनेचे पत्र शासन अध्यादेशाच्या नियमांची पायमल्ली करणारे आहे. तर काही ग्रामसेवकांनी कार्यालया बाहेर कामगारांनी बांधकाम प्रमाणपत्र मिळण्यासाठी भेटू नये. असे बोर्ड लावले. त्यावर आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आक्षेप घेत जिल्हा परिषद सीईओ गुलाबराव खरात यांची भेट घेत संबंधित सर्वांवर नियमानुसार कारवाई करावी.
या अनुषंगाने आज 30 सप्टेंबरला सायंकाळी आझाद हिंदच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेत त्वरित परिपत्रक काढत संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचे अध्यादेश पारित करण्या करिता स्मरण देण्यासाठी बैठक घेण्यात आली. 48 तासात कारवाई करावी अन्यथा आझाद हिंद च्या वतीने ग्रामसेवकांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
____
शासन प्रशासनाच्या अध्यादेशांची बुलढाणा जिल्ह्यात पायमल्ली..
शासन परिपत्रक क्र. व्हीपीएम 2015 /प्र.क्र. 237/ 3 ,ग्रामविकास विभाग 22/09/2017, 16/09/2015 या प्रमुख दोन अध्यादेशासह उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यांचे दिनांक 13/08/ 2014 रोजी ची अधिसूचना,13/08/2017 अधिसूचना, कामगार मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीचे इतिवृत्त दिनांक 8/04/2025 , महाराष्ट्र शासन उद्योग,ऊर्जा ,कामगार व खणीकर्म विभाग मुंबई यांचे पत्र क्रमांक 0325/प्र.क्र. कामगार- 7, दि.14/05/2025, महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स (Reg.of Emp and C.S. Rules 2007Chater vi 33 (C)) यासह इतरही शासन प्रशासन अध्यादेशांची पायमल्ली महाराष्ट्रातील एकमेव बुलढाणा जिल्ह्यात राजे रोसपणे होत आहे.
____
दलाला मार्फतच मिळते प्रमाणपत्र..
कामगारांची आर्थिक लूट.
ग्रामसेवकांच्या अडेल तट्टू धोरणामुळे बुलढाणा जिल्ह्यातील गरजवंत कामगारांच्या मुला मुलींचे शिक्षण,लग्न थांबले आहे. तर बहुतांश कामगारांच्या परिवारातील सदस्यांचे आरोग्य सुविधा सुद्धा थांबले आहेत.ज्या ग्रामसेवकांनी यापूर्वी कामगारांना ९० दिवसाचे प्रमाणपत्र दिले. त्यांना सदर प्रमाणपत्र पून्हा नोंदणी करण्यासाठी हेतू पुरस्कार टाळाटाळ करण्यात येत आहे. तर बहुतांश ठिकाणी दलाल मार्फत आलेले प्रमाणपत्र नोंदणीकृत होऊन कामगार कार्यालयातून नोंदणीकृत झाल्याचीही गंभीर बाब या निमित्ताने समोर येत आहे.
सदर गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष द्यावे. या अनुषंगाने त्वरीत आदेश परिपत्रक काढावे. अन्यथा आझाद हिंद च्या वतीने आंदोलनात्मक पवित्रा घेत अशा भ्रष्ट ग्रामसेवकांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी बैठकीदरम्यान प्रशासनाला दिला आहे.
Comments
Post a Comment