लॉयन्स क्लब खामगांव व धन्वंतरी चॅरीटेबल मेडीकल फाऊंडेशनचा उपक्रमस्व.श्री.श्रा.स. बावस्कर गुरुजी स्मृतीजिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

लॉयन्स क्लब खामगांव व धन्वंतरी चॅरीटेबल मेडीकल फाऊंडेशनचा उपक्रम
स्व.श्री.श्रा.स. बावस्कर गुरुजी स्मृती
जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
खामगांव :
(संतोष आटोळे)
 सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणाऱ्या लॉयन्स क्लब खामगांव व धन्वंतरी चारिटेबल मेडीकल फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वीं बाराव्या जिल्हास्तरीय स्व. श्र.स. बावस्कर गुरुजी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी बुलडाणा जिल्ह्यातून ग्रामीण, शहरी, अंध, अपंग व कर्णबधीर, सेवानिवृत्त, वरिष्ठ महाविद्यालय या गटामध्ये प्रस्ताव मागविण्यात आले होते. बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षक वृंदांनी प्रतिसाद देत सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी व्दारे प्रस्ताव पाठविले होते. ह्या प्राप्त प्रस्तावांचे मुल्यमापन करुन खालील प्रमाणे पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची नांवे गटनिहाय जाहीर करण्यात आली आहेत. या पुरस्काराचे वितरण रविवार दि. ०५ ऑक्टोबर २०२५ रोजी नगर परिषद लॉयन्स आय हॉस्पीटल सभागृह, नांदुरा रोड, खामगांव येथे प्रदान करण्यात येणार आहेत.

यावेळी जाहीर करण्यात आलेल्या प्राथमिक ग्रामीण विभागातून कु. अस्मिता विठ्ठलराव क्षिरसागर, सहा. अध्यापिका (जि.प. मराठी उच्च प्राथ. शाळा, सुनगांव, ता. जळगांव जा.), प्राथमिक शहरी विभागातून सौ. अंजली प्रविण क्षिरसागर, सहा. शिक्षिका (लोकमान्य बाळगंगाधर टिळक न.प. मराठी प्राथ. शाळा क्र ६, खामगांव), माध्यमिक शहरी विभागातून डॉ. फकीरा भगवान राजगुरु, विषय शिक्षक (जि.प. मराठी उच्च प्राथ. शाळा, पिंप्री माळी, ता. मेहकर), माध्यमिक ग्रामीण विभागातून श्री. देविदास सिताराम वले, सहा. अध्यापक (नवजीवन विद्यालय, रोहिणखेड, ता. मोताळा), अंध, अपंग, कर्णबधीर व आदिवासी विभागातून डॉ. प्रकाश रामभाऊ जगताप, मुख्याध्यापक व वाचा उपचार तज्ञ (निवासी मुकबधीर विद्यालय, खामगांव), सेवानृिवत्त विभागातून सेवानिवृत्तीनंतरही सदैव कार्य करणाऱ्या सौ. लता ओंकारसिंग राजपुत, सेवानिवृत्त अध्यापक (सावित्रीबाई फुले माध्य. विद्यालय, सिंदखेड राजा), वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक विभागातून प्रा. लक्ष्मण फुलचंद शिराळे, सहयोगी प्राध्यापक (विदर्भ महाविद्यालय, बुलडाणा) यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षकांना रु. ५००१ रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरणाचा सोहळा रविवार दि. ०५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.०० वा. लॉयन्स आय हॉस्पीटल सभागृह, जीएसटी ऑफीस समोर, नांदुरा रोड, खामगांव येथे मान्यवर व लॉयन्स पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकवृंदांना वैयक्तिकरित्या तसे कळविण्यात येत आहे. तरी या कार्यक्रमास आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांनी सपत्नीक उपस्थित रहावे अशी विनंती आयोजकांव्दारे लॉयन्स क्लब खामगांवचे प्रसिध्दी प्रमुख लॉ. डॉ. परमेश्वर चव्हाण, श्रमिक जैस्वाल व विजय मोरखडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केली आहे.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.