*राज्य सैनिक फेडरेशनच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदावर रामराव देशमुख*
*राज्य सैनिक फेडरेशनच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदावर रामराव देशमुख*
*खामगांव तालूक्याची बैठक संपन्न...विविध विषयांवर चर्चा*
*खामगाव* - महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनची खामगांव तालूका बैठक लक्ष अकॅडमी, खामगाव येथे संपन्न झाली. या सभेत खामगांव येथील माजी सैनिक श्री रामराव बाप्पू देशमुख गारडगावकर यांची सैनिक फेडरेशनचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली.त्यांचे नेतृत्वाखाली फेडरेशनच्या माध्यमातून सैनिकांच्या समस्या सोडवून त्यांच्या कल्याणासाठी व अन्याय निवारण कार्यासाठी प्रभावी काम होईल असा मनोदय पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.श्री रामराव बाप्पू हे एक कुशल समाजसेवक,यशस्वी उद्योजक,शेतकरी असून, त्यांनी सैन्यदलातील निवृत्तीनंतर स्टेट बॕंकेत रोखपाल म्हणून सेवा दिलेली आहे.ते लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे सुध्दा मार्गदर्शक तथा जिल्हा संघटक आहेत.त्यांची स्नेहशिल वृत्ती आणि सर्वसमावेशक कार्यामुळे ते सेवाभावी आणि सहकारी वृत्तीचे एक व्यक्तिमत्व म्हणून खामगांव आणि बुलढाणा जिल्ह्यात सुपरिचित आहेत. त्यांच्या निवडीचे विविध सामाजिक संस्था आणि त्यांच्या माजी सैनिक आणि ईतर सामाजिक मित्रांनी अभिनंदन केले आहे.
खामगांव तालूक्याच्या या संपन्न झालेल्या महत्वपूर्ण बैठकीस तालुक्यातील सैनिक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील विविध अडचणींवर चर्चा केली.
बैठकीमध्ये विशेषतः सीएसडी कॅन्टीन, ईसीएचएस सुविधा, सैनिक स्मारक उभारणी या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी सैनिक फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी डी. एफ. निंबाळकर, सैनिक फेडरेशन उद्योग विभाग सचिव श्री. रवींद्र घनबहादुर, अमरावती विभाग उपाध्यक्ष श्री. अर्जुन गवई, अकोला जिल्हा कार्याध्यक्ष श्री. समाधान तायडे, अकोला जिल्हा सचिव श्री. शेख खाजा आदी मान्यवर उपस्थित होते.
खामगाव तालुका फेडरेशनचे पदाधिकारी श्री. रामराव देशमुख, श्री. जगन्नाथ कळसकर, श्री. भास्कर बोराडे, तालुका अध्यक्ष श्री. रवी पवार ,श्री, प्रभाकर बुराडे श्री पहुरकर रवींद्र सावंग, श्री. हेलोडे तसेच सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
तसेच लक्ष अकॅडमीचे विद्यार्थी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आमच्या दादाना हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
Comments
Post a Comment