*जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी होणार - राजेंद्र दिक्षित**अपंग (दिव्यांग) कर्मचारी संघटनेच्या वतीने आदेशाचे स्वागत*
*जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी होणार - राजेंद्र दिक्षित*
*अपंग (दिव्यांग) कर्मचारी संघटनेच्या वतीने आदेशाचे स्वागत*
अमरावती (दिव्यांग शक्ती)
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम - ९१ अन्वये जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांची (यु डीआयडी कार्ड) UDID पडताळणी करण्यात येणार आहे. विभागाकडून त्याबाबतच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत. दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्र वैधते बाबत विभागास अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने ही पडताळणी करण्यात येत असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.
जिल्हा परिषदांमधील संबंधित सर्व विभागांतर्गत शिक्षण, आरोग्य, बांधकाम तसेच सर्व विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करून लाक्षणीक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींनाच शासनमान्य लाभ देण्यात येणार आहेत. पडताळणी अंती बनावट व नियमबाह्य प्रमाणपत्र किंवा ४० टक्यां पेक्षा कमी दिव्यांगत्व असल्याचे आढळल्यास संबंधितांना लाभ अनुज्ञेय केला जाणार नाही. अशा व्यक्तींना दिलेले लाभ बंद करण्यात येतील व त्यांनी घेतलेल्या लाभाबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, -२०१६ च्या कलम ९१ नुसार, अपात्र व्यक्तीने लाभ घेतल्यास
किवा घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यास दोन वर्षांपर्यंत कारावास, एक लाखापर्यंत दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे पडताळणीअंती अपात्र ठरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर संबंधित तरतुदीनुसार कठोर कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती शासन मान्य महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई 32 जिल्हा अमरावती चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दिक्षित यांनी दिली आहे.
राज्यातील बोगस दिव्यांगांची झाडाझडती घेण्याचे लेखी आदेश गुरुवार दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी राज्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व ३४ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. हे आदेश मिळताच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिव्यांग प्रमाणपत्रांच्या पडताळणीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे झेडपीच्या शिक्षण, आरोग्य, बांधकाम विभागासह सर्व विभागांतर्गत असलेले सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश आहे. यामुळे बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून प्रमाणपत्र
उडाली आहे. देणाऱ्या अधिकाऱ्यांची झोप
या पडताळणीचा अहवाल महिनाभरात सर्व झेडपीच्या सर्व सीओंकडून दिव्यांग कल्याण आयुक्तांना सादर करण्याचे निर्देशही तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या कलम ९१ अन्वये बोगस दिव्यांग व्यक्तीला दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षांसाठी पात्र ठरतो. राज्यात बोगस दिव्यांगांचा आकडा वाढला आहे. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणाऱ्या दिव्यांग अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासनाच्या
विविध सवलतींचा लाभ घेतात. याबद्दलच्या विभागास अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, या तक्रारींमध्ये दिव्यांगांच्या वैश्विक ओळखपत्राबाबत साशंकता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच एकूण ३४ जिल्हा परिषदेतील दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश दिव्यांग कल्याण विभागाने दिले आहेत. या आदेशाचे शासन मान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे तसेच दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे साहेबांचे हा महत्त्वाचा आदेश काढल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात येत आहेत असेही शेवटी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई जिल्हा अमरावतीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दिक्षित यांनी म्हटले आहे.
Comments
Post a Comment