घाटपुरी नाका परिसरात रस्ता विस्तारी करणासाठी खोदलेल्या खड्ड्यांना मजबूत कठडे लावा ....... माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा

(संतोष आटोळे)
ः सध्या नवरात्री उत्सव सुरू असून अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या घाटपुरी येथील आई जगदंबा देवीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक भक्त घाटपुरी येथील मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असतात परंतु घाटपुरी नाका परिसरात रस्ता विस्तारीकरणासाठी केलेल्या खोदकामामुळे या ठिकाणी रस्ता अरुंद झाल्याने अनेक किरकोळ अपघात होत आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास दुचाकी चालक युवक गाडी घेवून नालीत पडल्याची घटना घडली होती. याच ठिकाणी काही वेळातच एक स्कुटी गाडी स्लीप झाल्याने एक महिला आपल्या लहान मुलीसह गाडीवरून पडली. सुदैवाने दोन्ही घटनेमध्ये मोठा अनर्थ टळला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दि.23 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी घाटपुरी नाका येथे जाऊन परिसरातील नागरिकांसोबत चर्चा केली. यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीमती सरस्वतीताई खासने, माजी नगरसेवक ओम शर्मा, रवी भोवरे, सुरेंद्र पवार, धनंजय वानखडे,गोलु भेरडे आदी उपस्थित होते. नवरात्री उत्सवात देवीच्या दर्शनासाठी गद वाढत असून रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. रस्ता कामासाठी कंत्राटदाराने रस्त्याच्या बाजूला खोदकाम करतांना कोणतेही सूचना फलक , कठडे लावलेले नसल्याने या ठिकाणी अपघात होत असल्याचे सांगून नागरिकांनी संताप व्यक्त केला.या घटनेबाबत नगर परिषदेचे मुख्य प्रशासक यांना माहिती देऊन संबंधीत कंत्राटदाराने तातडीने मजबूत कठडे लावावे आणि घाटपुरी नाका रस्ता वाहतुकीचा मुख्य रस्ता आहे. परंतू या ठिकाणी रस्त्यावर मुरुम टाकण्यात आल्यामुळे वाहने घसरुन किरकोळ अपघात होत आहे. म्हणून याठिकाणी असलेले मुरुम काढुन या ठिकाणी सपाटीकरण करुन वाहतुकीसाठी चांगला रस्ता तयार करण्यात यावा तसेच नगर पालीका प्रशासनाच्या हलगजपणामुळे घाटपुरी नाका परिसरात रस्त्यालगत केलेल्या खोदकामामुळे एखादी अनुचित घटना घडल्यास त्याला मुख्याधिकारी व संबंधीत अधिकारी जबाबदार राहतील व नागरीकांच्या विनंतीनुसार या रस्त्याचे विजयादशमी नंतर युध्दस्तरावर समयबध्द कालावधीत काम पुर्ण करावे,अशी मागणी सुध्दा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केली आहे.

- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment