💥राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महसूल मंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर💥
राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महसूल मंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर .
खामगाव
(संतोष आटोळे)
राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा बुलढाणाच्या वतीने खामगाव येथील उपविभागीय अधिकारी डॉ रामेश्वर पुरी साहेब यांच्यामार्फत विविध मागण्यांचे निवेदन महसूल मंत्री तथा अध्यक्ष ओबीसी मंत्रिमंडळ उप समिती चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना पाठविले.
निवेदनामध्ये महाराष्ट्र शासनाने 2 सप्टेंबर 2025 रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे व हैदराबाद गॅझेटियर लागू केल्यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागला नाही असे मुख्यमंत्री फडणवीस साहेब वारंवार सांगत असले तरी शासनातील मंत्री ओबीसी आरक्षणाला मोठा धक्का लागल्याचे सांगत आहे . तर मनोज जरांगे पाटील गुलाल उधळून मराठा जिंकल्याचे सांगत आहे . त्यामुळे ओबीसी समाज द्विधा मनस्थितीमध्ये असून पुरता घाबरलेला आहे . खरे तर हैदराबाद गॅझेटियर मध्ये सामूहिक नोंदी आहे वैयक्तिक नोंदी नाही आणि कुणबी प्रमाणपत्र वैयक्तिक नोंदी शिवाय देता येत नाही . असे असताना सुद्धा 17 सप्टेंबर पासून मराठवाड्यातील जालना , नांदेड , हिंगोली , धाराशिव व बीड येथे हैदराबाद गॅझेटियर वरून कुणबी प्रमाणपत्र वाटल्याचे वेगवेगळे चैनल वरून सांगितल्या जात आहे . त्यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . म्हणून ओबीसीचे नेते म्हणून ओबीसी समाजातील भीतीचे वातावरण आपण दूर करावे अशी मागणी केली . यावेळी एकच पर्व ओबीसी सर्व , आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा गगनभेदी घोषणांनी उपविभागीय कार्यालय दणाणून गेले होते . यावेळी जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे , युवा जिल्हाध्यक्ष सुरज बेलोकार , विजय डवंगे , रामकृष्ण जवकार , नितीन इंगळे , मेजर सुभाष फेरन , निळकंठ सोनटक्के , चक्रधर बेलोकार , विश्वनाथ सातव , चंद्रकांत टेरे , कैलास फाटे , दीपक यादव , शेख हुसेन शेख हनीफ , रवी इंगोले , अमित फुलारे , रामेश्वर ठाकरे , मोनू सिंग , गजानन अहिर , रामेश्वर काटोले , दीपक महाजन , सोपान खंडारे , वसंता काळे , विजय वसतकार , हुसेन मलिक कुरेशी यांच्यासह अनेक ओबीसी समाज बांधव उपस्थित होते .
Comments
Post a Comment