बुलडाणा जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी जाहीर करा राष्ट्रवादी ची मुख्यमंत्र्याकडे मागणी
बुलडाणा जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी जाहीर करा राष्ट्रवादी ची मुख्यमंत्र्याकडे मागणी
खामगाव
(शेखर तायडे)
महाराष्ट्र सह बुलडाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटी जन्य पाऊस झाला त्यामध्ये शेतकऱ्यांचं होत्याच नव्हतं झालं शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे पावसाची तीव्रता इतक्या मोठ्या प्रमाणात होती की अनेक घरे ही पाण्याखाली गेली जीवनावश्यक वस्तू ही नष्ट झाल्या त्यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झालं त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्व सामान्य नागरिक संकटात सापडला आहे त्यासाठी आता त्यांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे सरकारने झालेल्या नुकसानीची पंचनामे करण्यात येत न घालवता शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी SP गटाकडून करण्यात आली असून सत्तेत बसलेल्या सरकारने ने निवडणुकी पूर्वी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू असे आश्वासन दिले होते मात्र ते अद्याप ही पाळण्यात आले नाही त्यामुळे त्यांना आपल्या आश्वासनाचे स्मरण करून देण्यासाठी निवेदन देण्यात आले असून दिलेले कर्जमाफी चे आश्वासन पूर्ण करा अशी मागणी ही यावेळी निवेदनातून करण्यात आली आहे खामगाव येथील उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना भरीव मदत करा अशी मागणी करण्यात आली आहे त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ संतोष तायडे, तालुकाध्यक्ष संजय बगाडे, शेख अयाज,उमेश बाबुळकर, संतोष पेसोडे, राम कोकरे,डॉ ज्ञानेश्वर रावणकार, मोहन पाटील, महादेव ढगे, चंद्रपाल गवई , शुभम राऊत, भीमराव सोनवणे, महेश बोदडे, गौरव पवार, सज्जाद खान सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment