दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी दिव्यांग बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आता माघार नाही तर गुलाल उधळूनच मागे हटणार नाही
दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी दिव्यांग बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले
आता माघार नाही तर गुलाल उधळूनच मागे हटणार नाही
जालना
(राहुल मुळे)
शहरातील शहरातील दिव्यांगांना घरकुल आणि जागा व्यवसाय करण्यासाठी दोनशे स्केअर फुट जागा या मागणीसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटना शिवसेना दिव्यांग आघाडीच्या वतीने आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून आमरण उपोषणाला बसलेली आहे आता माघार नाहीत तर गुलाल उधळूनच मागे हटणार असा निर्धार सकल दिव्यांग सामाजिक संघटना शिवसेना दिव्यांग आघाडीने केलाय आतापर्यंत एकाही दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी जागा मिळाली महानगरपालिका दिव्यांगाच्या विरोधात आहे का असा प्रश्न सकल दिव्यांग सामाजिक संघटना शिवसेना दिव्यांग आघाडीने केलाय या उपोषणाला शिव सेना दिव्यांग आघाडीने जिल्हाध्यक्ष अनिल मगदूले सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे सविता बोराडे राजेश काविटी सुभाष सामने शेक इस्माईल रवी तायडे रगनाथ शिंदे अंकुश वाकचौरे शेख रशीद जगदीश सातपुते रेणुका वाहुकर अशपाक सय्यद मिनाबाई काळबांडे आदि उपोषणाला बसलेले आहे
चौकट
उपोषणाला विविध पक्षाचा पाठिंबा
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटना शिवसेना दिव्यांग आघाडी उपोषणाला बसलेले आहे या उपोषणाला विविध पक्षाचा पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे प्रहार अपंग क्रांती आंदोलन जिल्हा अध्यक्ष रवींद्र अंभोरे भाजपचे नगरसेवक विजय पवार वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके हरीश रत्नपारखे धर्मवीर छावा संघटनेचे लक्ष्मण गाडेकर आदींनी उपोषणाला पाठिंबा जाहीर केला आहे
Comments
Post a Comment