त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई कराव्हॉईस ऑफ मिडियाची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे मागणी
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करा
व्हॉईस ऑफ मिडियाची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे मागणी
खामगाव ः त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केला. या घटनेचा आज २३ सप्टेंबर रोजी व्हॉईस ऑफ मिडिया संघटनेकडून तीव्र निषेध नोंदविण्यात आला. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.
निवेदनामध्ये नमुद आहे की, २० सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर अचानकपणे भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात योगेश खरे, अभिजित सोनवणे आणि किरण ताजने हे इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे पत्रकार गंभीर जखमी झाले आहेत. सुसंस्कृत महाराष्ट्रात अशा पद्धतीची घटना अतिशय निंदनीय आहे. व्हाॅइस ऑफ मीडिया या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत असून पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षक कायद्याअंतर्गत कठोरात कठोर कारवाई करावी जेणेकरून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांवर पुन्हा अशा पद्धतीने हल्ला होणार नाही. या प्रकरणातील आरोपींच्या विरोधात विशेष सरकारी वकिलांच्या माध्यमातून खटला चालवावा आणि आरोपींना कठोर शासन करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष तथा व्हॉईस ऑफ मिडिया संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोरआप्पा भोसले, तालुका अध्यक्ष मंगेश तोमर, जिल्हा पदाधिकारी शरद देशमुख, अनिल खोडके, शहर अध्यक्ष सुमित पवार, तालुका अध्यक्ष सिध्दांत उंबरकार, नाना हिवराळे, किरण मोरे, मोहन हिवाळे, नितेश मानकर, अमोल गावंडे, मुबारक खान, सुनिल गुळवे, तहेसीन शाह, संतोष करे, आकाश शिंदे, दगडु तायडे, सचिन बोहरपी, नितीन इंगळे, विकास कुळकर्णी, संतोष आटोळे, सुरज बोराखडे, मनोज नगरनाईक यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment