*जयंत येवला आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित*
*जयंत येवला आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित*
*नाशिक (बबलू मिर्झा) - शारीरिक दिव्यांगत्वावर मात करून हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविण्याचा विडा उचललेल्या जयंत येवला यांना "लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयल्स" यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार नाशिक पश्चिम च्या आमदार सिमा हिरे, प्रांतपाल राजेश कोठावदे,लायन्स क्लबचे अध्यक्ष राहुल वेढणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जयंत येवला हे स्वतः दिव्यांग असून इतरांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची त्यांची धडपड ही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे आमदार सिमा हिरे यांनी सांगितले.या प्रसंगी लायन्स प्रशांत कोतकर, लायन्स विशाल वाणी, कुणाल मुसळे,ज्ञानदेव बोंडे, प्रशांत अमृतकर आदी मान्यवर उपस्थित होते.*
*जयंत येवला यांचे मनपा शाळा क्रमांक 73 चे मुख्याध्यापक संजय मोरे,पर्यवेक्षक पद्माकर बागड,दिव्यांग शाळेचे माजी मुख्याध्यापक मारुती गाडेकर,दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बबलु मिर्झा यांच्या सह शाळेतील शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.*
त्यांना दिव्यांग शक्ती परवाराच्या वतीने अभिनंदन
Comments
Post a Comment