अंडर पास रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमकराष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचे अंडर पासवर आदोलन 6 महिन्यात अंडर पास पूर्ण करू रेल्वे विभागाचे राष्ट्रवादी ला लेखी पत्र
अंडर पास रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचे अंडर पासवर आदोलन
6 महिन्यात अंडर पास पूर्ण करू रेल्वे विभागाचे राष्ट्रवादी ला लेखी पत्र
खामगाव( संतोष आटोळे):
गेल्या काही महिन्यांपासून खामगाव मध्ये रेल्वे मार्गावर अंडर पास मार्गाचे काम बंद अवस्थेत आहे त्यामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून हा अंडर पास मार्ग बंद करा ही मागणी घेऊन दि.२२ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. संतोष तायडे ,यांच्या नेतृत्वात आक्रमक झाली असून मागणी मान्य झाली नाही तर थेट अंडर पास पुलावर उड्या घेऊ असा इशारा देत कार्यकर्ते पुलावर पोहचले होते.आंदोलक अतिशय आक्रमक असून रेल्वे पोलिस आणि आंदोलक कर्त्यांमध्ये चर्चा करून तब्बल 3 तासानंतर रेल्वे पोलिसांनी 6 महिन्यात अंडर पास तैयार करून देतो अस लेखी आश्वासन यावेळी रेल्वे विभागाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी ने आंदोलन मागे घेतले असून स्थानिक परिसरातील नागरिकांनी राष्ट्रवादी चे आभार व्यक्त केले आहे. आंदोलन वेळी तालुका अध्यक्ष संजय बगाडे, अल्पसंख्यांक चे शेख अयाज, तालुका कार्याध्यक्ष संतोष पिसोडे, सामजिकजन्याय तालुका अध्यक्ष उमेश बाहुळकर, ज्ञानेश्वर रावनकार, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष मोहन खोटरे, ओबीसी तालुका उपाअध्यक्ष शकर बगाडे,वीरेंद्र वानखडे आदी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment