पालकमंत्री हरविल्याची राष्ट्रवादी ची पोलिसात तक्रार💥दोन्ही पालकमंत्री शोधून देणाऱ्याला 11 रुपये बक्षीस💥-संजय बगाडे
💥बुलडाणा जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री हरविल्याची राष्ट्रवादी ची पोलिसात तक्रार💥
दोन्ही पालकमंत्री शोधून देणाऱ्याला 11 रुपये बक्षीस💥-संजय बगाडे
खामगाव
(शेखर तायडे)
महाराष्ट्रासह बुलडाणा जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे इतकंच नाही तर शेकडो हेक्टर शेती ही पिकासह अक्षरशः खरडून गेली काही ठिकाणी अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत अतिशय भयावह परिस्थिती असतांना ही बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील तर सह पालकमंत्री हे संजय सावकारे हे नेमून दिले आहेत जिल्ह्याला 2 पालकमंत्री असूनही संकट काळी दोन्ही पालकमंत्री हरविले आहेत शेतकऱ्यांच्या बांधावर अजूनही कुणी पोहचले नाहीत आपल्या AC च्या रूम मध्ये बसून अधिकाऱ्यांना फक्त ते सूचना करत असल्याची माहिती आहे खर तर हे दोन्ही पालकमंत्री आपल्या बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर हवे होते मात्र तसे झाले नाही त्यामुळे आमचे पालकमंत्री हरविले असल्याची आम्हाला शंका आहे त्यामुळे साहेबांनी शोध पथक रवाना करत आमचे पालकमंत्री शोधून द्यावे त्यासाठी आम्ही पोलिसात हरवल्याची तक्रार देत आहोत तरी पोलिसांनी पालकमंत्री यांना तात्काळ शोधून शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांना पाठवावे ही विनंती अश्या आशयाची तक्रार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने पोलिसात दिली आहे त्यावेळी राष्ट्रवादी चे जिल्हा उपाध्यक्ष डॉ संतोष तायडे,तालुकाध्यक्ष संजय बगाडे,अल्पसंख्याक नेते शेख अयाज,डॉ ज्ञानेश्वर रावनकार संतोष पेसोडे,सह राष्ट्रवादी चे कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment