अनेक सन्मान प्राप्तडॉ. दीपक पाचपोर यांना आयुर्वेदाचार्य २०२५ पुरस्कार
अनेक सन्मान प्राप्त
डॉ. दीपक पाचपोर यांना आयुर्वेदाचार्य २०२५ पुरस्कार
खामगाव
(संतोष आटोळे) खामगाव येथील असे प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य
वैद्य दीपक प्रभाकर पाचपोर यांना
प्रभावशाली आयुर्वेदाचार्य २०२५
हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे
हा पुरस्कार बैद्यनाथ आयुर्वेद लिमिटेड आणि सकाळ वृत्तपत्र समूह यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रदान केला जाणार आहे.
'गौरवगाथा महाराष्ट्रातील प्रभावशाली आयुर्वेदाचार्य २०२५' हा मानाचा पुरस्कार भारताच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री, श्री नितीनजी गडकरी यांच्याहस्ते उद्या १० ऑगस्ट रोजी वैद्य दीपक पाचपोर यांना नागपूर येथे प्रदान करण्यात येईल. वैद्य दीपक पाचपोर हे गेल्या २२ वर्षांपासून आयुर्वेद माध्यमातून रुग्णसेवा देत आहेत. त्याचबरोबर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार करण्याचे कार्यही करत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्याना हा पुरस्कार जाहिर झाला आहे त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
आपली बोलीभाषा संस्कृती
विषयी नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी असणारे डॉक्टर दीपक पाचपोर यांचे दिव्यांगशक्ती परिवार विराट मल्टीपर्पस फाउंडेशन या दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
Comments
Post a Comment